धक्कादायक..! ती घरातुन बाहेर गेली अन वासनेची शिकार ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 04:13 PM2018-10-19T16:13:01+5:302018-10-19T16:16:27+5:30
घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली, पदोपदी भेटत गेलेल्या नराधमांच्या वासनेची ती शिकार बनली. तब्बल एक महिना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे,
पिंपरी : घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेली, पदोपदी भेटत गेलेल्या नराधमांच्या वासनेची ती शिकार बनली. तब्बल एक महिना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोघांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. ही घटना २१ सप्टेंबर ते १३ आॅक्टोबरपर्यंत या कालावधीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल अहमद शेख (दिघी) तसेच विनय हनुमंत ननावरे (चक्रपाणी वसाहत, भोसरी) या दोन आरोपीना अटक केली आहे, एक आरोपी फरार झाला आहे. आळंदी येथे राहणारी १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी घरात कोणाला काही न सांगता, २१ सप्टेंबरला निघून गेली. भाड्याने मोटारी उपलब्ध होत असलेल्या एका संस्थेच्या मोटार चालकाने तिला मोटारीत बसविले. लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. पुढे तिला विमाननगर परिसरात सोडून दिले.
विमाननगर परिसरात आणखी एक मोटार चालक या मुलीला भेटला. त्याने तिला स्वत:च्या घरी नेले. काही दिवस घरी ठेवले. त्यादरम्यान तिच्यावर अत्याचार केले. नंतर तिला मित्राच्या ताब्यात दिले. या मित्राने सुद्धा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिघांनी अत्याचार केल्यानंतर त्यांच्या तावडीतून तिची सुटका झाली.
............................