धक्कादायक! आरोपींनी ‘त्या’ महिलेला जिवंत दफन केलं; कशी निघाली थडग्यातून बाहेर तिने सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:40 PM2020-04-29T16:40:56+5:302020-04-29T16:42:07+5:30
यानंतर त्या दोघांनी रात्री नीना यांना जवळच्या क्रबिस्तानात नेले. त्याठिकाणी नीना यांच्या चेहऱ्यावर पाणी टाकून शुद्धीत आणलं
यूक्रेन – शहरात एक धक्कादायक घटना समोर येत आहे. याठिकाणी ५७ वर्षीय महिला नीना रुडचेन्को यांना शेजारच्या एका व्यक्तीने दारु पाजून बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला जिवंत दफन करण्यात आलं. नीना मरियान्स्के येथे राहतात.
त्यांनी सांगितले की, त्यांच्या शेजारच्या दोन व्यक्ती दारु पिऊन घरात घुसले. पहिल्यांदा या लोकांनी माझ्या घराची तोडफोड केली. त्यानंतर मला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे माझ्या तोंडाला आणि नाकाला मोठी दुखापत झाली. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, बेसबॉलच्या बॅटने नीना यांना मारहाण करण्यात आली. जवळपास २ तास नीना यांना टॉर्चर करण्यात आले. त्यानंतर नीना बेशुद्ध झाल्या.
यानंतर त्या दोघांनी रात्री नीना यांना जवळच्या क्रबिस्तानात नेले. त्याठिकाणी नीना यांच्या चेहऱ्यावर पाणी टाकून शुद्धीत आणलं. त्या आरोपींना नीनाला तिच्यासाठी थडगे खोदायला लावले त्यानंतर त्यात दफन होण्यास सांगितले. स्थानिक माध्यमांशी बोलताना नीना म्हणाल्या की, मी थडग्यात पडली ते लोक मला दफन करु लागले. तेव्हा मी माझा चेहरा झाकून घेतला. त्यामुळे मला थोडी हवा येण्यास मदत झाली. ते दोघं मोठमोठ्याने हसू लागले. माझ्या कुटुंबाला संपवण्याचा त्यांचा डाव होता. त्यानंतर माझा मृत्यू झाला समजून ते दोघं निघून गेले असं त्यांनी सांगितले.
ते लोक तिथून निघून गेल्यानंतर मी थडग्यावरील माती हटवण्यास सुरुवात केली. त्यानंतर घरी पोहचल्यावर नीना परत बेशुद्ध झाल्या. नीना यांची बहीण लुडमिया गौरा यांनी सांगितले की, नीना यांचा चेहरा रक्ताने भरलेला होता. ते रक्त काळं पडलं होतं. आणि सूजदेखील आली होती. तिला कोणी ओळखू शकत नव्हते त्यावेळी आम्ही तिला रुग्णालयात घेऊन गेलो. तेव्हा तिची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण झाले.
स्थानिक डॉक्टर ओलेक्संडर क्लेम्चेक यांनी सांगितले की, नीना यांच्या डोक्याला जबर मारहाण झाली होती. अगदी तिचा जबडा आणि नाक पूर्णपणे तुटले होते. पोलिसांनी या प्रकरणी दोन भावांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत हत्येचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. जर या प्रकरणी ते दोषी आढळले तर त्यांना १० वर्ष किंवा त्याहून जास्त शिक्षा होऊ शकते.