धक्कादायक! ...म्हणून वडिलांनी तब्बल 17 दिवस डीप फ्रीजरमध्ये ठेवला मुलाचा मृतदेह; सांगितलं असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 09:58 PM2021-08-18T21:58:56+5:302021-08-18T22:04:36+5:30
Crime News : वडिलांचा आरोप आहे की, तरुणीने लाखोंची संपत्ती स्वत:च्या नावावर केली आहे. त्यानंतर ती शिवांकला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत होती.
सुलतानपूर - दिल्लीत काही दिवसांपूर्वी शिवांक पाठक (३२) या तरुणाचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. तो उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथील राहणारा होता. शिवांकच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी तब्बल १७ दिवस त्याचा मृतदेह डीप फ्रीजरमध्ये प्रिझर्व करून घरातच ठेवला होता. त्याच्या त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. मात्र, जेव्हा ते पोलीस ठाण्यात गेले तेव्हा कोणताही गुन्हा दाखल केला नाही. या सर्व प्रकारानंतर तरुणाच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल करीत एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे, असं वडिलांचं म्हणणं आहे.
शिव प्रसाद पाठक लष्करातून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मोठा मुलगा शिवांक २०१२ मध्ये दिल्लीला गेला होता. तेथे एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होता. यादरम्यान त्याने एका अन्य व्यक्तीसोबत मिळून एक कंपनी सुरू केली. कंपनीत एचआर म्हणून नोकरी करीत असलेल्या तरुणीसोबत शिवांक मे २०१३ मध्ये लग्न केलं.
वडिलांचा आरोप आहे की, तरुणीने लाखोंची संपत्ती स्वत:च्या नावावर केली आहे. त्यानंतर ती शिवांकला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत होती.१९ जुलै २०२१ रोजी शिवांक आपला लहान भाऊ इशांकला फोन करुन आपल्या जीवाचं काहीतरी बरंवाईट होण्याबाबत भीती व्यक्त केली होती. त्यावेळी तो म्हणाला होता की, त्याची हत्या केली जाऊ शकते किंवा कोणत्या गुन्हेगारीत अडकवलं जाऊ शकतं. या फोनवरील संवादाचं रेकॉर्डिंग इशांकच्या मोबाइलमध्ये आहे.
पिस्तुलांच्या विक्रीसाठी आलेल्या मध्यप्रदेशच्या दोघांना विक्रोळी येथे अटकhttps://t.co/uMNe4a7xtb
— Lokmat (@MiLOKMAT) August 18, 2021
रेल्वेत नोकरी करणारा इशांक लखऊनमध्ये तैनात आहे. तो म्हणाला की, शिवांकची पत्नी गुलरीन कौरने दिल्लीतील मोतीनगर भागात राहणारी माझी बहीण पुनम मिश्रा हिला फोन करुन सांगितलं की, शिवांक बेशुद्ध झाला आहे. त्याचं शरीर पिवळे पडले आहे. ते तिथं पोहोचले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं, यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
शिवांगच्या वडिलांनी सांगितलं की, १ ऑगस्ट रोजी त्यांना मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली. हा मृत्यू संशयास्पद आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत हे प्रकरण पोलिसात दाखल केलं जात नाही, तोपर्यंत ते मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही. शिवांगच्या मृत्यू प्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली नाही, एवढंच नाही तर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्टही देण्यात आलेला नाही.
थरारक! कुर्ला रेल्वे स्थानकात धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी मारून संपवलं आयुष्यhttps://t.co/0HyLOApAGe
— Lokmat (@MiLOKMAT) August 18, 2021