धक्कादायक; सावत्र बापाचा १५ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 01:48 PM2023-01-08T13:48:43+5:302023-01-08T13:48:56+5:30

वरूड तालुक्यातील घटना : आरोपी अटक

Shocking; Stepfather molested 15-year-old girl, accused arrested in amravati | धक्कादायक; सावत्र बापाचा १५ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग, आरोपीला अटक

धक्कादायक; सावत्र बापाचा १५ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग, आरोपीला अटक

Next

अमरावती: सावत्र बापाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना वरूड तालुक्यात घडली. याप्रकरणी ७ जानेवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास वरूड पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीविरूध्द बलात्कार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून, त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
             
तक्रारीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची ३५ वर्षीय आई तिच्या मोठ्या मुलीच्या अर्थात पिडिताच्या मोठ्या बहिणीच्या प्रसुतीसाठी बाहेरगावी गेली होती. तर पिडिता ही सावत्र बापाच्या घरी एकटीच होती. दरम्यान, १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ च्या सुमारास ती मुलगी घरातील कामे आटोपून हॉलमध्ये बसली असताना आरोपी सावत्र बाप तेथे आला. तिला धमकी देत त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने १ डिसेंबर २०२२ ते ६ जानेवारी रोजीपर्यंत त्याने तिच्यावर वारंवार अतिप्रसंग केला. दरम्यान, आई परत आल्यानंतर तिने ही बाब तिला सांगितली. अखेर तिने ७ जानेवारी रोजी सायंकाळी वरूड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिची आपबिती ऐकून तक्रार दाखल करवून घेतली. वरूड पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवत आरोपीला शनिवारी रात्रीच अटक केली.

आरोपीला न्यायालयात नेले - बागडे

पिडिताची आई तिच्या मोठया मुलीच्या प्रसुतीसाठी बाहेरगावी गेली होती. त्याचा गैरफायदा घेत सावत्रबापाने आपल्यावर अतिप्रसंग केल्याचे पिडिताने तक्रारीत म्हटले आहे. आरोपीला अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
सारिका बागडे, सहायक पोलीस निरिक्षक,
वरूड पोलीस ठाणे

Web Title: Shocking; Stepfather molested 15-year-old girl, accused arrested in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.