धक्कादायक...आयआयटीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 22:01 IST2018-09-03T22:00:49+5:302018-09-03T22:01:38+5:30

धक्कादायक...आयआयटीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
मुंबई - आयआयटी मुंबईमध्ये एम. टेक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव जयदिप स्वाईन असून तो छत्तीसगड येथील निवासी आहे.
जुलै महिन्यात जयदिप स्वाईन यांनी कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या एम.टेक या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला. हॉस्टेल क्रमांक १ मध्ये त्याला खोली मिळाली होती.
नोव्हेंबर महिन्यात परीक्षा असल्यामुळे अभ्यास करण्यास त्यांनी सुरु केले होते. तो इतर मुलांसोबत जास्त मिसळत नसल्याची माहिती इतर विद्यार्थ्यांकडून मिळाली आहे. ३१ आॅगस्ट रोजी जोगेश्वरी येथील एका हॉटेलमध्ये गेला. आज त्याने सकाळी वेटरकडून ब्रेकफास्ट मागिवला होता. त्यांनतर तो बाहेरच आला नाही. आज सकळी व्हेटर त्याच्या रुमजवळ असताना त्याला वास आला. त्याने व्यवस्थापनला हे सांगितल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांनी दरवाजा काढल्यानंतर जयदिप बेडवर मृत अवस्थेत सापडला. मृतदेहाच्या बाजुला डिप्रेशनच्या गोळ्या मिळाल्या असल्याचे आंबोली पोलिसांने सांगितले. ही आत्महत्या आहे की दुसरे काही अशी चर्चा आयआयटीच्या विद्यार्थ्यांमध्ये रंगली होती.