धक्क्कादायक ! गोव्यात आईची तानुल्यासह आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 07:20 PM2019-03-27T19:20:43+5:302019-03-27T19:22:54+5:30
कौटुंबिक कलहामुळे पदमावती हिने आत्महत्येचे टोकाचा मार्ग स्विकारला असावा असा पोलिसांना संशय आहे.
मडगाव - दक्षिण गोव्यातील मडगाव येथून साधरणात तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या मुंगुल येथे रेल्वे रुळावर माय - लेकीचा आज सकाळी मृतदेह सापडला. पदमावती चव्हाण (24) या महिलेने आपल्या तीन वर्षीय मुलीसह आत्महत्या केल्याची माहिती कोकण रेल्वेपोलिसांनी दिली. वास्को येथे जाणा:या गोवा एक्सप्रेस रेल्वेच्या त्यांना धडक बसल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत मुंगुल येथे रहात असून, ती मूळ कर्नाटक राज्यातील हुबळी येथील आहे. आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होउ शकले नाही. मात्र कौटुंबिक कलहामुळे पदमावती हिने आत्महत्येचे टोकाचा मार्ग स्विकारला असावा असा पोलिसांना संशय आहे.
पदमावती हिच्या विवाहाला चार वर्षे पुर्ण झाली होती. तिच्या पतीचा कोलवा येथे कापड विक्रीचा व्यवसाय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विवाहाच्या सात वर्षाच्या आत आत्महत्येची ही घटना घडल्याने या प्रकरणाची चौकशी आता उपदंडाधिकाऱ्यामार्फत होणार आहे. काल बुधवारी सकाळी मुंगुल येथे रेल्वेरुळावर दोन मृतदेह सापडल्याची माहिती कोकण रेल्वे पोलिसांना मिळाल्यानतंर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी जाउन पंचनामा केला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. मृतदेह गोवा वैदयकीय महाविदयालय इस्पितळाच्या शवगारात ठेवले आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुळशीदास मडकईकर हे पुढील तपास करीत आहेत.