धक्कादायक! प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवल्याच्या रागातून शिक्षकाचा गळा चिरला
By पूनम अपराज | Published: October 17, 2020 02:55 PM2020-10-17T14:55:04+5:302020-10-17T14:57:31+5:30
France Teacher Beheaded : या गोळीबारात आरोपीचा खात्मा करण्यात आला. या प्रकरणाची दहशतवादी घटनेशी संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येणार आहे.
पॅरिस - पॅरिस नुकतेच आपल्या विद्यार्थ्यांना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्या शिक्षकाची शाळेच्या बाहेर त्याचा शिरच्छेद करण्यात आला. राष्ट्रपति इमैनुएल मैक्रॉन यांनी याला इस्लामिक दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटले आहे. शिक्षकाचा गळा चिरणाऱ्या आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनीगोळीबार केला. पोलिसांच्या या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाला. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्या शिक्षकाचा एकाने गळा चिरला. या हत्येची माहिती समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात आरोपीचा खात्मा करण्यात आला. या प्रकरणाची दहशतवादी घटनेशी संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येणार आहे.
२०१५ मध्ये फ्रान्समध्येही इस्लामिक हल्ले झाले होते
२०१५ मध्ये फ्रान्समधील वादग्रस्त व्यंगचित्र मासिक ''शार्ली ऐब्दो' आणि राजधानीतील यहूदी सुपरमार्केटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपासून इस्लामिक हिंसाचाराची लाट काही प्रमाणात दिसून येत आहे. या हल्ल्यातील हत्येचा संबंध 'दहशतवादी संघटने'शी जोडला आहे का हे फ्रेंच अँटी टेरर प्रॉसिक्यूटर तपासून पाहत आहे.
ही घटना फ्रेंच राजधानीपासून 30 किमी अंतरावर घडली
फ्रान्सची राजधानी पॅरिसपासून 30 किलोमीटर (२० मैल) अंतरावर कॉन्फ्लॅन्स सेंट-होनोरिनच्या वायव्य उपनगरातील एका मध्यम शाळेच्या बाहेर हा हल्ला झाला. शाळेजवळील संशयिताचा फोन आल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिसांना तेथे शिक्षकाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला शोधून काढण्यात आलं. त्यावेळी त्याच्या हातात ब्लेड होतं. पोलिसांना आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना धमकावले. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी गोळीबार केला आणि त्याला गंभीर जखमी केले. पण नंतर त्याचा मृत्यू झाला. सूत्रांनी सांगितले की, एका अल्पवयीन मुलासह चार जणांना ताब्यात घेण्यात आली आहे. हे सर्व हल्लेखोराशी संबंधित होते.
शिक्षक शिकवत होते अभिव्यक्ति स्वतंत्रता
या हल्ल्यात ठार झालेल्या शिक्षक इतिहास शिकवत होते. शाळेतील मुलांबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयावर चर्चा करताना शिक्षकाने प्रेषित मोहम्मद यांची व्यंगचित्रं दाखविली. शाळेतील एका विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले की, शिक्षकाने मुस्लिम विद्यार्थ्यांना व्यंगचित्र दाखविण्यापूर्वी वर्गबाहेर जाण्यास सांगून "वादंग" निर्माण केला होता.
चारजण ताब्यात
पोलिसांनी या घटनेनंतर एका अल्पवयीन मुलासह चारजणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे हल्लेखोर आरोपीशी संबंधित आहेत. पोलिसांनी या चौघांची चौकशी सुरू केली आहे. शिक्षकाची हत्या केल्यानंतर आरोपीला पळून जाण्यास त्यांनी मदत केली असल्याचा आरोप आहे.
इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैंगबर यांचे व्यंगचित्र प्रकाशित केल्यानंतर सात जानेवारी २०१५ रोजी चार्ली हेब्दोच्या पॅरिसच्या येथील कार्यालयावर दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये १२ जण ठार झाले होते. या हल्ल्यात फ्रान्समधील काही दिग्गज व्यंगचित्रकारही ठार झाले होते. चार्ली हेब्दोच्या मुखपृष्ठावर अनेक व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले होते. यामध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्राचाही समावेश होता. हे व्यंगचित्र जीन काबूट यांनी काढले होते. २०१५ मध्ये झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. साप्ताहिकाच्या कार्यालयावर सात जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात संपादकांसह १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवडाभरात हे साप्ताहिक पुन्हा सुरू करण्यात आले. त्यानंतर त्या साप्ताहिकाचा खप १० हजार प्रतींवरून थेट दोन लाख प्रतींवर पोहोचला होता.