धक्कादायक घटना! प्रियकराने केला 'डर'मधील 'शाहरुख खान' बनण्याचा प्रयत्न, कुटुंबाला धरले ओलीस, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 09:02 PM2022-05-23T21:02:32+5:302022-05-23T21:11:36+5:30
Crime News: बिहारमधील बेतिया येथे एका सणकी प्रियकराने तब्बल सहा तास तुफान गोंधळ घातला. या प्रियकराने सुरुवातीला फिल्मी स्टाईलमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून प्रेयसीच्या कुटुंबीयांना ओलीस धरले. त्यानंतर पोलीस बोलण्यासाठी गेले असता त्यांनाही ओलीस धरले.
पाटणा - बिहारमधील बेतिया येथे एका सणकी प्रियकराने तब्बल सहा तास तुफान गोंधळ घातला. या प्रियकराने सुरुवातीला फिल्मी स्टाईलमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून प्रेयसीच्या कुटुंबीयांना ओलीस धरले. त्यानंतर पोलीस बोलण्यासाठी गेले असता त्यांनाही ओलीस धरले.
ही घटना बानूछापर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र कॉलनीमधील आहे. येथे शिक्षक अरुणकुमार राय यांच्या घरामध्ये सहा लोक सुमारे सहा तास ओलीस राहिले. त्याचे झाले असे की, सतीश नावाचा एक सणकी तरुण शिक्षकांच्या मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. मात्र त्या तरुणीने नकार दिल्यावर त्याने फिल्मी स्टाईलमध्ये सदर तरुणी आणि तिच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून ओलीस धरले.
जेव्हा पोलीस या कुटुंबाला सोडवण्यासाठी घटनास्थळावर पोहोचले तेव्हा आरोपीने त्यांनाही ओलीस धरले. त्यानंतर बेतिया पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवत सदर युवकाला पकडले आणि अटक केली. त्यानंतर सहा तास चाललेल्या या नाट्याची अखेर झाली. सदर तरुण हा मोतिहारीमधील गोविंदगंज येथील रहिवासी आहे. तो या शिक्षकाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. प्रेमात अपयशी ठरल्याने त्याने प्रेयसीच्या संपूर्ण कुटुंबाला ताब्यात घेतले होते.
या घटनेबाबत बेतियाचे एसपी उपेंद्रनाथ वर्मा यांनी सांगितले की, एका सणकी तरुणाने बंदुकीचा धाक दाखवत संपूर्ण कुटुंबाला ओलीस धरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या तरुणाला अटक केली.