धक्कादायक! लग्नाच्या वाढदिवशीच कुटुंबाला संपविले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 11:16 AM2023-05-20T11:16:00+5:302023-05-20T11:16:18+5:30

मोहन हा पत्नी पूजा व मुलगी श्रेया यांच्या सोबत वळदगावात चार महिन्यांपासून भाड्याने राहत होता.

Shocking! The family was terminated on the wedding anniversary itself | धक्कादायक! लग्नाच्या वाढदिवशीच कुटुंबाला संपविले

धक्कादायक! लग्नाच्या वाढदिवशीच कुटुंबाला संपविले

googlenewsNext

वाळूज महानगर : लग्नाच्या वाढदिवशीच पत्नी व मुलीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  शुक्रवारी सकाळी वळदगावात  घडली. या घटनेत मोहन प्रताप डांगर (२९), पत्नी पूजा डांगर (२५) व मुलगी श्रेया (५) हे तिघे मयत झाले असून, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मोहन हा पत्नी पूजा व मुलगी श्रेया यांच्या सोबत वळदगावात चार महिन्यांपासून भाड्याने राहत होता. गुरुवारी रात्री तिघांनीही घरालगतच राहणारी पूजाची आई शोभाबाई मेहर यांच्या घरी जेवण केले. शुक्रवारी सकाळी ९ वाजले तरी नात श्रेया ही आजी शोभाबाई यांच्याकडे न आल्याने त्या जावई मोहन डांगरच्या घरी गेल्या. 

Web Title: Shocking! The family was terminated on the wedding anniversary itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.