धक्कादायक! डोंबिवली, कोपर दिवा मार्गावर ३ जणांचा रूळ ओलांडताना मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 05:28 PM2020-08-08T17:28:52+5:302020-08-08T17:29:33+5:30

भर पावसातील गुरुवार रात्रीची घटना, लोहमार्ग पोलिसांचे वारस शोधण्याचे काम सुरु

Shocking! Three persons died while crossing the line on dombivali, Kopar Diva Marg | धक्कादायक! डोंबिवली, कोपर दिवा मार्गावर ३ जणांचा रूळ ओलांडताना मृत्यू

धक्कादायक! डोंबिवली, कोपर दिवा मार्गावर ३ जणांचा रूळ ओलांडताना मृत्यू

Next
ठळक मुद्देठाणे स्थानक हद्दीतही एका बेवारस मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे वाडीबंदर पोलीसांनी जाहिर केलेल्या माहिती पत्रकावरून स्पष्ट झाले.

डोंबिवली: सोसाटयाचा वारा आणि जोरदार पाऊस यामुळे रेल्वे गाड्या येण्याचा अंदाज न आल्याने तिघा जणांचा रेल्वे रुळ ओलांडण्याच्या नादात अपघातीमृत्यू झाल्याची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश पवार यांनी दिलेल्या माहितीनूसार हे तीनही अपघात डोंबिवली, कोपर दिवा गुरुवारी रात्री मार्गावर झाले आहेत.


त्यासंदर्भात शुक्रवारी मध्यरात्री लोहमार्ग पोलीसांना सूचना मिळाली आणि त्यानूसार अपघाती अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एक अपघात हा डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांमधून फलाट ५ च्या दिशेने व्यक्ती येत असतांना रेल्वे गाडीची धडक बसून झाला. तर अन्य दोघे कोपर दिवा मार्गावर रुळ ओलांडत असतांनाच त्यांचाही अपघात झाला, त्यात तिघेही मयत झाले असून तिघांच्या वारशांचा तपास सुरु असून सध्या बेवारस नोंद असल्याचे ते म्हणाले. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटे उशिरापर्यंत पावसाचा वेग प्रचंड होता. त्यात रुळ ओलांडतांना गाड्यांच्या वेगाचा अंदाज न आल्याने हे अपघात झाले असावेत असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला. ठाणे स्थानक हद्दीतही एका बेवारस मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याचे वाडीबंदर पोलीसांनी जाहिर केलेल्या माहिती पत्रकावरून स्पष्ट झाले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

सुशांतच्या डायरीची शेवटची पाने महत्वाची, सुगावा लागू शकतो मारेकऱ्याचा

 

Breaking : वलसाडमधील बायोकेमिकल कंपनीला भीषण आग

 

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

Web Title: Shocking! Three persons died while crossing the line on dombivali, Kopar Diva Marg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.