धक्क्कादायक! वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; दोघं जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 02:41 PM2019-05-18T14:41:58+5:302019-05-18T14:42:19+5:30

शमशाद अहमद मोहम्मद हसन खान (२४) यांच्यसह सज्जाद अहमद मोहम्मद हसन खान (२८) याने मारहाण केली.

Shocking! Traffic police officer assualted; both are arrested | धक्क्कादायक! वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; दोघं जेरबंद 

धक्क्कादायक! वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; दोघं जेरबंद 

Next
ठळक मुद्दे वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोघांना अटक दोन्ही भावांना अटक करण्यात आली आहे.     शमशाद अहमद मोहम्मद हसन खान (२४) याच्यासह सज्जाद अहमद मोहम्मद हसन खान (२८) याने मारहाण केली.

मुंबई - कांदिवली परिसरात वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोघांनाअटक केली आहे. कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनधिकृत पार्क गाड्यांवर कारवाई करत असताना प्रभारी पोलीस निरीक्षक विठ्ठल सीताराम शिंदे यांना गाडी मालक असलेल्या शमशाद अहमद मोहम्मद हसन खान (२४) याच्यासह सज्जाद अहमद मोहम्मद हसन खान (२८) याने मारहाण केली. याप्रकरणी दोन्ही भावांना अटक करण्यात आली आहे.    

कांदिवली पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात भा. दं. वि. कलम 353, 332, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक विभागात काम करणारे प्रभारी पोलीस निरीक्षक विठ्ठल सीताराम शिंदे (५३) हे अनधिकृत पार्क गाड्यांवर क्लीपिंग कारवाई करत असताना आरोपी नामे शमशाद अहमद मोहम्मद हसन खान आणि सज्जाद अहमद मोहम्मद हसन खान यांनी संगनमत करून फिर्यादीच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून हाताच्या ठोश्याने मारहाण करून जमिनीवर पाडले आणि लाथा - बुक्यांनी मारहाण करून जखमी केले. सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केलेल्या पोलिसाला आणि साक्षीदारांना धमकी दिली म्हणून गुन्हा नोंद दाखल करण्यात आला. 



 

Web Title: Shocking! Traffic police officer assualted; both are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.