धक्कादायक! कार खाडीत पडून पुण्यातील दोघांचा हडफडेत बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:35 PM2021-09-20T14:35:22+5:302021-09-20T14:35:50+5:30

Drowning Case : घटना सोमवारी पहाटे घडली. सदर जोडपे बुधवारी स्वत:च्या वाहनाने गोव्यात पर्यटना निमीत्त दाखल झाले होते.

Shocking! Two fell into a creek who were come from pune and drowned | धक्कादायक! कार खाडीत पडून पुण्यातील दोघांचा हडफडेत बुडून मृत्यू

धक्कादायक! कार खाडीत पडून पुण्यातील दोघांचा हडफडेत बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्दे घटनेची माहिती मिळताच पिळर्ण येथील अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटना स्थळी दाखल होऊन या जोडप्याला गाडीतून बाहेर काढले.

म्हापसा -  कळंगुट नजीक असलेल्या हडफडे-बागा येथील खाडीत पुण्यातील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो चालवत असलेल्या अलिशान कारवरील ताबा सुटून गाडी पाण्यात पडून दोघा जोडप्यांचा बुडून मृत्यू. घटना सोमवारी पहाटे घडली. सदर जोडपे बुधवारी स्वत:च्या वाहनाने गोव्यात पर्यटना निमीत्त दाखल झाले होते.


घटनेची माहिती मिळताच पिळर्ण येथील अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटना स्थळी दाखल होऊन या जोडप्याला गाडीतून बाहेर काढले. घटना पहाटे ५ च्या दरम्यान घडल्याची शक्यता दलाकडून व्यक्त करण्यात आली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या भागात वाहनांची वर्दळ अत्यंत कमी प्रमाणावर होती. गाडी पाण्यात पडल्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडा आरोड केला होता पण  योग्यवेळी सहकार्य लाभू शकले नव्हते.


या प्रकरणात तपास करणाऱ्या हणजुण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर जोडपे बुधवारी गाडीने गोव्यात पर्यटनासाठी आली होती. त्यानंतर परिसरातील एका खाजगी हॉटेलात उतरली होती. खाडी पडलेली गाडी क्रमांक एमएच १२ आरटी ७७६६ पाण्यातून बाहेर काढली जात आहे. ज्यावेळी हा घटना घडली त्यावेळी शूभम बेडगे (२८) हा तिरकसवाडी पूणे येथील युवक गाडी चालवत होता तर गाडीच्या मागच्या सिटवर ऐश्वरी देशपांडे (२५) ही युवती मागच्या सिटवर बसली होती. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालय बांबाळी येथे पाठवण्यात आले आहे. हणजुण पोलिसांनी मयत कुटुंबियांशी संपर्क साधला आहे. अपघाताचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नसल्याची माहिती निरीक्षक सुरज गांवस यांनी दिली.

Web Title: Shocking! Two fell into a creek who were come from pune and drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.