मुंबईनंतर नाशकातही 'सेक्सटॉर्शन'चा धक्कादायक प्रकार; तरुणाला अश्लीलतेच्या जाळ्यात अडकवून उकळले ११ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 02:38 PM2021-06-03T14:38:01+5:302021-06-03T14:44:11+5:30

फेसबुक असो किंवा अन्य कोणतेही सोशल ॲप यावरुन जर अनोळखी व्यक्ती आपल्याला मैत्रीची विनंती पाठवित असेल तर हे एक फसवणूकीचे जाळे फेकले गेले आहे आणि अश्लीलता हाच त्याचा केंद्रबिंदू समजून त्याकडे दुर्लक्ष करत असे मैत्रीचे प्रस्ताव धुडकावून लावण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

Shocking type of 'sextortion' in Nashik after Mumbai; 11 thousand boiled by trapping the youth in the net of obscenity | मुंबईनंतर नाशकातही 'सेक्सटॉर्शन'चा धक्कादायक प्रकार; तरुणाला अश्लीलतेच्या जाळ्यात अडकवून उकळले ११ हजार

मुंबईनंतर नाशकातही 'सेक्सटॉर्शन'चा धक्कादायक प्रकार; तरुणाला अश्लीलतेच्या जाळ्यात अडकवून उकळले ११ हजार

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांनी दिला सोशलमिडियावर सावधगिरीचा इशाराअश्लीलता हाच केंद्रबिंदूमहिलेच्या नावाने अकाउंट वापरणारे अनेकदा पुरुष असतातशारिरिक लोभाचे आमीष

नाशिक :सोशल मीडियाद्वारे अनोळखी कथित महिलांकडून ह्यफ्रेन्ड रिक्वेस्टह्ण पाठवून ओळख करुन घेत मैत्री वाढवून नंतर अश्लील चॅटींग व व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचा अर्थात सेक्सटॉर्शन करण्याचा प्रकार राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ नाशिक जिल्ह्यातसुध्दा घडल्याचे उघडकीस आले आहे. पिंपळगाव बसवंत परिसरात एका तरुणाची अशाप्रकारे आर्थिक फसवणूक झाली आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सोशलमिडियावर याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर सेक्सटॉर्शनचा प्रकार आल्यामुळे ग्रामीण पोलिसांचे सायबर सेल सतर्क झाले आहे. सचिन पाटील यांनी सायबर सेलला सतर्क राहून अशा टोळीचा पर्दाफाश करण्याबात आदेशित केले आहे. तसेच ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून जनप्रबोधनात्मक पोस्टदेखील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून व्हायरल करण्यात आली आहे. ग्रामीण भागात कुठेही अशाप्रकारे जर आर्थिक फसवणूक कोणाची झाली असेल तर त्यांनी निसंकोचपणे पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीसांकडे येऊन तक्रार द्यावी. संबंधित तक्रारदार व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही पाटील यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.
सोशल मीडियाचे प्रत्येक ॲप्लिकेशन अत्यंत सतर्कतेने आणि प्रायव्हसी सेटिंग्ज योग्यपणे सक्रीय करुन वापरण्यास प्राधान्य द्यावे तसेच ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यापुर्वी योग्य ती पडताळणी अवश्य करुन घ्यावी. व्हॉट्सॲप , फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारखे तसेच गुगलकडून हे ॲप्लिकेशन वापरता अचानकपणे अनोळखी डेटिंग ॲप्लिकेशनच्या दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींना बळी न पडता डेटींग ॲपची जाहिरात ब्लॉक करावी आणि असे ॲप्लिकेशन तरुणांनी विरुध्दलिंगी आकर्षणापोटी अजिबात डाऊनलोड करु नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अश्लीलता हाच केंद्रबिंदू
फेसबुक असो किंवा अन्य कोणतेही सोशल ॲप यावरुन जर अनोळखी व्यक्ती आपल्याला मैत्रीची विनंती पाठवित असेल तर हे एक फसवणूकीचे जाळे फेकले गेले आहे आणि अश्लीलता हाच त्याचा केंद्रबिंदू समजून त्याकडे दुर्लक्ष करत असे मैत्रीचे प्रस्ताव धुडकावून लावण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे. अनेकदा विरुध्दलिंगी आकर्षणापोटी तरुण किंवा तरुणी या जाळ्यात अडकून आपली आर्थिक फसवणूक करुन घेण्यास कारणीभूत ठरतात. तुमच्याशी चॅटींग किंवा व्हीडिओ कॉल करणारी व्यक्तीचा एकच उद्देश असतो तो म्हणजे ब्लॅकमेलिंग हे लक्षात घ्यायला हवे, असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

 

Web Title: Shocking type of 'sextortion' in Nashik after Mumbai; 11 thousand boiled by trapping the youth in the net of obscenity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.