धक्कादायक! चिमुरडीचे लैंगिक शोषण करणाऱ्या पित्यास २४० वर्षे तुरुंगवास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 08:44 PM2018-10-15T20:44:56+5:302018-10-15T20:45:19+5:30
पॅट्रीसिओ आणि लिसाला शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या मुलांना सरकारी अनाथालयात पाठवण्यात आले होते. मात्र, एका कुटुंबाने या तिनही मुलांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली.
टेक्सास - टेक्सास येथील वाको परिसरात एक धक्कादायक घटना घडली होती. एक महिन्याच्या चिमुरडीचे लैंगिक शोषण करून तिचे पाय तोडणाऱ्या नराधम वडिलाला येथील न्यायालयाने तब्बल २४० वर्षांच्या करावासाची शिक्षा सुनावली आहे. पॅट्रीसिओ मॅडिना ( वय 27) असे दोषी आरोपी पित्याचे नाव आहे. तसेच बालिकेवरील केलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत माहिती पोलिसांना कळवण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईला देखील दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लिसा मोन्टोया असं आईचं नाव आहे. दरम्यान पीडित मुलगी व तिच्या इतर दोन भावंडांना एका कुटुंबाने दत्तक घेतले आहे.
पॅट्रीसिओ आणि लिसाला शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या मुलांना सरकारी अनाथालयात पाठवण्यात आले होते. मात्र, एका कुटुंबाने या तिनही मुलांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवली. त्यानंतर सर्व आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांनी ही तीन मुले दत्तक घेतली आहेत. पीडित बालिकेच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.