धक्कादायक! पत्नीचे अपहरण अन् सामूहिक बलात्कार; आरोपींनी साक्षीदार पतीला जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:35 IST2025-02-19T14:34:30+5:302025-02-19T14:35:30+5:30

पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.

Shocking! Wife's kidnapping and gang rape; Accused burn husband alive | धक्कादायक! पत्नीचे अपहरण अन् सामूहिक बलात्कार; आरोपींनी साक्षीदार पतीला जिवंत जाळले

धक्कादायक! पत्नीचे अपहरण अन् सामूहिक बलात्कार; आरोपींनी साक्षीदार पतीला जिवंत जाळले


UP Crime :उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये अतिशय धक्कादयक घटना घडली आहे. पत्नीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील साक्षीदार पतीला आरोपींनी डिझेल टाकून जिवंत जाळले. नातेवाईकांनी कपड्याच्या आधारे मृताची ओळख पटवली. या घटनेनंतर मृताच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांनी अर्धा जळालेला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मैनपुरीच्या बिछवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. नुकताच एका शेतात अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता, तो 40 वर्षीय साजिदचा असल्याचे समजले. कुटुंबीयांनी कपड्यांवरून साजिदचा मृतदेह ओळखला. काही काळापूर्वीच साजिदच्या पत्नीचे अपहरण करुन तिला चार महिने ओलीस ठेवण्यात आले होते. यादरम्यान, तिच्यावर अनेकदा सामूहिक बलात्कारही झाला. या खटल्यात साजिद हा साक्षीदार होता. 

मृताच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपी भोला प्रधान आणि त्याच्या मुलांनी साजिदवर तडजोडीसाठी दबाव टाकला होता. कोर्टात साक्ष न देण्यासाठी सातत्याने साजिदला धमक्या मिळत होत्या. अनेकवेळा त्याला मारहाणही केली. साजिदने न ऐकल्याने शेवटी त्याला जिवंत जाळले. याप्रकरणी मैनपुरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title: Shocking! Wife's kidnapping and gang rape; Accused burn husband alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.