धक्कादायक! महिलेने केला अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 19:33 IST2020-01-15T19:29:28+5:302020-01-15T19:33:36+5:30

या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 

Shocking! Woman sexually assaulted to a minor boy | धक्कादायक! महिलेने केला अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! महिलेने केला अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

ठळक मुद्देहरयणात एक महिला राहत होती. १० वर्षापूर्वी तिच्या पतीचा करंट लागल्याने अचानक मृत्यू झाला होता. सप्टेंबर २०१९ मध्ये महिलेने तरुणाच्याविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली. पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत महिलेच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अजून सदर महिलेला अटक करण्यात आलेली नाही.

हरयाणा - एका २९ वर्षीय महिलेने एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर बलात्कार केला आहे. या प्रकरणी पलवाल पोलिसांनी आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. 

हरयणात एक महिला राहत होती. १० वर्षापूर्वी तिच्या पतीचा करंट लागल्याने अचानक मृत्यू झाला होता. तेव्हापासून हरयाणाच्या पलवाल परिसरात राहत होती. तेव्हा तिची ओळख एका मुलाशी झाली. या तरुणाचे महिलेच्या घरी येणे जाणे वाढले होते. दरम्यान महिलेने तरुणाशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्यांच्यात लग्नाची बोलणी देखील झाली. काही दिवसांनी महिला गरोदर राहिली. तेव्हा तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. शेवटी सप्टेंबर २०१९ मध्ये महिलेने तरुणाच्याविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली. पोलिसांनी तरुणाला न्यायालयीन कोठडीत पाठविले होते. तरुण हा अल्पवयीन असून त्याचे वय 14 वर्षे असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मुलाला कोर्टाकडून दोषमुक्त करण्यात आले. पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत महिलेच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अजून सदर महिलेला अटक करण्यात आलेली नाही.

Web Title: Shocking! Woman sexually assaulted to a minor boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.