धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:36 PM2020-08-22T12:36:26+5:302020-08-22T12:49:08+5:30

Hyderabad Rape case: लग्नानंतर या महिलेवर पतीने आणि तिच्या सासरच्यांनी लैंगिक अत्याचार केले व मारहाणही केली. यानंतर तिने तलाक घेतला. तलाक घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. 

Shocking! woman was raped and sexually abused by 143 people; 42-page FIR Police | धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल

धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल

googlenewsNext

तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये (Hyderabad Rape case) मोठा खळबळजनक प्रकार घडला आहे. एका महिलेने 143 लोकांनी अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या २५ वर्षीय पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांत 143 लोकांनी अनेकदा बलात्कार, अतिप्रसंग केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 42 पानांचा FIR (42 Pages FIR) नोंदविला आहे. 


हैदराबादच्या पुंजागुट्टा पोलिसांनी 42 पानांचा एफआयआर नोंदविला आहे. या पानांमध्ये या 143 लोकांची माहिती आहे. या लोकांविरोधात पीडितेने बलात्कार केल्याचा आरोप लावला आहे. आता पोलीस या सर्व आरोपींची चौकशी करणार आहे. यामध्ये काही महिलाही सहभागी आहेत. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. 


पीडितेने ज्या लोकांवर आरोप केले आहेत त्यामध्ये तिच्या ओळखीचे, राजकारणी, विद्यार्थी नेता, पत्रकार, फिल्म आणि अन्य क्षेत्रातील व्यक्ती आहेत. लग्नानंतर या महिलेवर पतीने आणि तिच्या सासरच्यांनी लैंगिक अत्याचार केले व मारहाणही केली. यानंतर तिने तलाक घेतला. तलाक घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. 


महिलेनुसार गेल्या काही वर्षांपासून ती लैंगिक अत्याचाराचा शिकार बनली आहे. मात्र, पहिल्यांदाच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेने काही आरोपींवर ठार मारण्याची धमकी देणे आणि ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्याचाही आरोप केला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

पंजाब बॉर्डरवर BSF ची मोठी कारवाई; पाच पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले

अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा

शिबू सोरेन यांना कोरोना; झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही होणार टेस्ट

सोनू सूदचे 'ते' ट्विटर खाते बनावट; म्हणाला ''लवकरच अटक होणार''

65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य

वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द

 

Web Title: Shocking! woman was raped and sexually abused by 143 people; 42-page FIR Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.