शॉकिंग ! सुसाईड नोट लिहिण्यापूर्वी भैय्यू महाराजांना 'नशिल्या औषधांचा डोस'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 08:32 PM2019-03-19T20:32:35+5:302019-03-19T20:35:20+5:30
याप्रकरणी तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल केले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
इंदूर – भैय्यूजी महाराज आत्महत्याप्रकरणी महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. भैय्यू महाराज यांनी १२ जून १०१८ रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अनेक शंकाकुशंकांचे वादळ उठले होते. मात्र, इंदूरच्या एसएसपी रुची वर्धन मिश्र यांनी आता मोठा खुलासा करत धक्कादायक माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. भैय्यू महाराज यांनी आत्महत्या करण्यापूर्वी औषधांच्या नशेत सुसाईट नोट लिहिली होती आणि ती सुसाईड नोटमध्ये नशेने प्रभावित होऊन संपत्ती विनायक या सेवकऱ्याच्या नावे कारवी असे लिहून घेण्यात आलं असल्याचं देखील इंदूरचे एसएसपी रुचि वर्धन मिश्र यांनी सांगितले. याप्रकरणी तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल केले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणातील आरोपी भैय्यूजी महाराज यांचे सेवक असणारे विनायक, शरद आणि महिलेकडून भैय्यूजी महाराजच्या पत्नीकडून घेतलेला ब्लँक चेक जप्त करण्यात आले असून न्यायालयात हे पुरावे महत्वाचे ठरणार आहेत. भैय्यू महाराज यांची संपत्ती हडप करण्याचा व संस्थेवर ताबा मिळवण्याची तीन आरोपींना कटकारस्थान रचले होते. शेवटी भैय्यूजी महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये आपल्या संपत्तीची जबाबदारी ही विनायक याची राहिले होते. मात्र ते देखील नशेचे औषध देऊन त्यांना प्रभावित करून लिहून घेण्यात आलं होत. तसेच तिघेही आरोपी नेहमी महाराजांकडून पैसे घेऊन त्यांना ब्लॅकमेल करत असत अशी माहिती पुढे त्यांनी दिली.