धक्कादायक! युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून संपवली जीवनयात्रा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 05:33 PM2021-05-02T17:33:02+5:302021-05-02T17:34:51+5:30

Suicide Case : पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी शव पुलगावच्या रुग्णालयात हलविण्यात आले.      

Shocking! The young farmer ended his life by jumping into a well | धक्कादायक! युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून संपवली जीवनयात्रा 

धक्कादायक! युवा शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून संपवली जीवनयात्रा 

googlenewsNext
ठळक मुद्देदहेगाव (गावंडे) येथील युवा शेतकरी  विशाल हनुमंत कासारे वय २७ हा शनिवारच्या सकाळी ८ वाजता केळापूर शिवारात असलेल्या शेतात गेला.सकाळची वेळ असल्याने शेतात काम करणारे शेतकरी या विहिरीवर पाणी पिण्यासाठी आले असता सदर घटना त्यांच्या लक्षात आली. 

चिकणी (जामनी) - दहेगाव येथील युवा शेतकऱ्याने केळापूर शिवारातील विहिरीमध्ये आत्महत्या केल्याची घटना शनिवारच्या सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दहेगाव (गावंडे) येथील युवा शेतकरी  विशाल हनुमंत कासारे वय २७ हा शनिवारच्या सकाळी ८ वाजता केळापूर शिवारात असलेल्या शेतात गेला आणि लगतच्या प्रभाकर भोयर केळापूर यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली यामुळे गावावर शोककळा पसरली. सकाळची वेळ असल्याने शेतात काम करणारे शेतकरी या विहिरीवर पाणी पिण्यासाठी आले असता सदर घटना त्यांच्या लक्षात आली.  या घटनेची माहिती विशालच्या नातेवाईकांना देण्यात आली, व पुलगाव पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी शव पुलगावच्या रुग्णालयात हलविण्यात आले. 
    

विशालकडे अडीच एकर शेत आहे. शेती करण्यासाठी त्याने २००८ साली सोसायटीच्या मद्यमातून १७ हजार रुपये कर्ज उचलले होते. पण नापिकी मुळे कर्जाची परतफेड होऊ शकली नाही,यामुळे त्याला आतापर्यंत सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करावी लागत होती. या वर्षी शेतीचा लागवड खर्चही निघाला नाही, यामुळे घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा. अडीच एकर शेताच्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने तो गवंडी कामावर मजुरीसाठी जात होता. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गवंडी कामला लागणारे साहित्य वेळेवर मिळत नसल्यामुळे परिणामी बांधकाम बंद राहत आहे. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, आजारी बहिणीचा उपचार कसा करावा या विवंचनेत असताना शेवटी त्याने मृत्यूला कवटाळले. 

Web Title: Shocking! The young farmer ended his life by jumping into a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.