धक्कादायक! वरळी सी लिंकवरून उडी मारून तरुणाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 17:48 IST2019-07-12T17:46:17+5:302019-07-12T17:48:07+5:30
पार्थ सोमाणी (२३) असं या तरुणाचं नाव

धक्कादायक! वरळी सी लिंकवरून उडी मारून तरुणाने केली आत्महत्या
मुंबई - वरळी सी लिंकवर टॅक्सी थांबवून एका तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. पार्थ सोमाणी (२३) असं या तरुणाचं नाव असून तो टॅक्सीने वांद्रे - वरळी सीलिंकवरून प्रवास करत होता. दरम्यान त्याने टॅक्सीवाल्याला सीलिंकवर अचानक टॅक्सी थांबविण्यास सांगितली आणि पार्थने समुद्रात उडी मारली अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वरपे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.
मुलुंड येथे पार्थ हा राहणार असून सीएकडे नोकरी करत होता. आज दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास वरळीकडून वांद्रे येथे जात असताना ही घटना घडली. अदयाप पार्थचा मृतदेह सापडला नसून तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेण्याचे कार्य पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. वरळी कोळीवाडा, शिवाजी पार्कच्या दिशेने असलेल्या समुद्रावर हेलिकॉप्टर गस्त घालत आहे. ज्या टॅक्सीने पार्थ सीलिंकवर आला होता. तो टॅक्सीचालक टॅक्सी घेऊन पळाला आहे. त्याचा शोध सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलीस घेत आहेत. सध्या सूर्यास्त झाल्याने तरुणाचा शोध घेणं तटरक्षक दलाने थांबवले असून उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई - वरळी सी लिंकवरून उडी मारून तरुणाने केली आत्महत्याhttps://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 12, 2019