सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार, कोयत्याने वार करीत जिवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये दहशत

By नामदेव भोर | Published: March 19, 2023 04:43 PM2023-03-19T16:43:00+5:302023-03-19T16:52:42+5:30

यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून एका कामगाराला बंदुकीचा धाक दाखवत त्याच्या दुचाकीने. सिनेस्टाईल पळ काढला.

Shooting at youth in Satpur area, fatal attack by stabbing; Terror among citizens | सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार, कोयत्याने वार करीत जिवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये दहशत

सातपूर परिसरात तरुणावर गोळीबार, कोयत्याने वार करीत जिवघेणा हल्ला; नागरिकांमध्ये दहशत

googlenewsNext

नाशिक : शहरातील सातपूर येथील कार्बन नाका परिसरात रविवारी (दि.19) असलेल्या म्हसोबा मंदिराजवळ तरुणावर चारचाकितून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करीत जिवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोर तिघांनी जुन्या वादातून तरुणावर गोळीबार तसेच कोयत्याने वार केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशत पसरली आहे. यानंतर मारेकऱ्यांनी आपले वाहन घटनास्थळी सोडून एका कामगाराला बंदुकीचा धाक दाखवत त्याच्या दुचाकीने. सिनेस्टाईल पळ काढला.

प्रत्यक्ष दर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तपन जाधव आपल्या चारचाकीमधून (एम एच 04 एक्स 5678) प्रवास करत असताना कार्बन नाका परिसरात आरोपी आशिष जाधव आपल्या २ साथीदारांसह (एम एच 15 डी एम7639) या वाहनातून येत तपनच्या गाडीला धडक दिली. यानंतर गाडीखाली उतरत त्याच्यावर कोयत्याने वार केले तसेच  गोळीबार जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिघांनी मिळून केलेल्या या हल्ल्यात तपन जाधव गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कामगाराची दुचाकी पळवली
घटनेनंतर धडक बसल्याने आरोपींची गाडी बंद पडली होती. यामुळे त्या मार्गावरुन जाण्याऱ्य़ा एका कामगाराला आरोपींनी थांबवले. बंदूक अन् कोयत्याचा धाक दाखवत त्या कामगाराची दुचाकी घेऊन संशयित आरोपींनी घटनस्थळावरुन पळ काढला.

या घटनेमुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहीले आहे. घटनेची माहिती मिळताच शहर गुन्हेशाखा उपायुक्त प्रशांत बछाव, परिमंडळ दोन चे उपयुक्त चंद्रकांत खांडवी,  सहायक पोलिस आयुक्त विश्वास मोरे, युनिट दोनचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ,  राजू पठाण यांच्यासह सातपूर पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Shooting at youth in Satpur area, fatal attack by stabbing; Terror among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.