खेड तालुक्यातील वरची भांबुरवाडी येथील पोलिस पाटीलावर गोळीबार; गावट्टी कट्टा लॉक झाल्याने जीव वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 07:37 PM2020-06-28T19:37:50+5:302020-06-28T19:38:07+5:30
वाळूंज हे थेट त्याच्या चारचाकीमध्ये बसून थेट राजगुरुनगर येथील एका खाजगी रुग्णालयात आले.
राजगुरूनगर: वरची भांबुरवाडी येथील पोलिस पाटील सचिन भिवसेन वाळुंज (वय ३५ ) यांच्यावर गोळीबार झाला. हि घटना वरची भांबुरवाडी ता खेड येथे घडली आहे. मात्र एक फायरिंग झाल्यावर गावट्टी कट्टा लॉक झाल्याने जीव वाचला आहे. एक गोळी त्याच्या हाताच्या मनगटाला लागली असुन हाताचे हाड फॅक्सर झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस पाटील सचिन वाळुंज यांना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठेकेदार संजय कौटकर यांचा फोन आला की, "पाण्याची टाकी बांधायची जागा दाखविण्यासाठी तुम्ही इकडे या" दरम्यान सचिन वांळूज हे त्यांच्या चारचाकी गाडीत गेले होते. तेथे कौटकर यांच्या सोबत आलेले मित्र व वाळुंज यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. सौरभ अनिल ढोरे, विपुल भिमाशंकर थिगळे, अतुल ऊर्फ बंटी काळूराम भांबुरे हे सर्व (रा. वरची भांबुरवाडी ता खेड ) त्या ठिकाणी आगोदरच दबा धरून बसलेले होते.अचानक फटाक्यासारखा मोठा आवाज आला. म्हणून सचिन वाळुंज हाताला हात लावला हातातुन रक्त वाहत होते. समोर पाहीले असता सौरभ ढोरे यांने वाळुंज यांच्या वरती गावठी कट्टा रोखला होता मात्र तो फायर झाला नाही. दरम्यान वाळूंज यांनी तेथून पळ काढला. त्याच्या पाठीमागे सौरभ ढोरे, विपुल थिगळे व अतुल भांबुरे यांनी मागे पळून दगड मारले.
वाळूंज हे थेट त्याच्या चारचाकीमध्ये बसून थेट राजगुरुनगर येथील एका खाजगी रुग्णालयात आले. त्यांच्या उजवा हाताच्या मनगटाला गोळी लागली असुन हाड फॅक्चर झाले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेची माहिती मिळताच तालुक्यातील पोलिस पाटील व मित्रपरिवारानी रुणालयाच्या आवारात गर्दी केली होती. वाळुंज यांच्यावर राजकिय वादातुन गोळीबार झाला आहे असे ग्रामस्थांनी सांगितले.घटनास्थळी पोलिस दाखल झाले असुन याबाबत पंचनामा केला आहे.आरोपी व मुख्य सुत्रधार यांचा शोध पोलिस घेत आहे.