धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये दुकानं उघडी ठेवली; पोलिस जाताच अंगावर फेकलं गरम तेल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 01:06 PM2021-05-16T13:06:32+5:302021-05-16T13:13:19+5:30
अनेक ठिकाणी कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केला जात आहे
वाढत्या कोरोनाच्या कहरापासून बचावासाठी सर्वच ठिकाणी कडक लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. पोलिस आणि प्रशासनाकडून कोरोनाच्या नियमांचे सक्तीचे पालन करण्यास सांगितले जात आहे. पण काहीजणांचा निष्काळजीपणा सगळ्यांनाच महागात पडू शकतो. नियमांचे पालन करत नसलेल्या नागरिकांवर प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केला जात आहे. अशीच एक घटना बिहारच्या बांका जिल्ह्यातून समोर आली आहे.
बांका जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असतानाही एका माणसानं आपलं दुकान सुरू ठेवलं त्यामुळे गर्दी जमा झाली. पोलिस या दुकानात कारवाई करण्यास पोहोचले तेव्हा दुकानातील माणसांनी गरम तेल पोलिसांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे एक पोलिस कर्मचारी आणि चार इतर लोक खूप वाईट प्रकारे भाजले आहेत.
बांका जिल्ह्यातील बौंसीमधील श्याम बाजारातील एका दुकानदारानं हे कृत्य केले. सगळ्यात आधी दुकानदारांनी नियमांचे उल्लंघन केल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर ते आपल्या टीमसह श्याम बाजारात पोहोचले . तेव्हा दुकानदारानं पोलिसांना विरोध केला. चहा नाष्त्याचं दुकान चालवत असलेल्या गणेश पंडित नावाच्या व्यक्तीनं पोलिसांच्या अंगावर गरम तेल फेकलं. या हल्यात पोलिस कर्मचारी राजकिशोर सिंह आणि दोन पोलिस पूर्णपणे जखमी झाले. कोरोना रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन कंसंट्रेटर’ची मागणी; जाणून घ्या, ऑनलाईन कसं आणि कितीला खरेदी कराल?
पोलिस गंभीर जखमी झाल्यानंतर अतिरिक्त पोलिस फोर्सला बोलावण्यात आले. त्यानंतर सगळी दुकानं बंद करून आरोपी गणेश आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं. राजकिशोर यांच्यासह इतर जखमींना ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपी पिता पुत्राला हत्येचा प्रयत्न आणि माहामारी एक्ट सारख्या गंभीर प्रकरणांसाठी तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. म्युकोरमायकोसिस अशाप्रकारे करतो शरीरावर हल्ला, ही आहेत संसर्गाची कारणं; तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती