दुकानाचा कामगार निघाला चोर; पुण्यातून ठोकल्या बेड्या

By सागर दुबे | Published: April 1, 2023 02:07 PM2023-04-01T14:07:41+5:302023-04-01T14:07:59+5:30

५ दिवसांची सुनावली पोलिस कोठडी

shop Worker is thief; arrested from Pune, Jalgaon crime news | दुकानाचा कामगार निघाला चोर; पुण्यातून ठोकल्या बेड्या

दुकानाचा कामगार निघाला चोर; पुण्यातून ठोकल्या बेड्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रामेश्वर कॉलनीतील नंदकिशोर शिंदे यांच्या दुकानातून ५ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा माल चोरून त्याची परस्पर विक्री करणा-या कामगाराला एमआयडीसी पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. विशाल शरद पाटील (रा. मेहरूण) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव असून त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शिंदे यांचे श्री समर्थ किराणा नावाचे दुकान आहे. या दुकानातील कामगार विशाल याने ५ लाख ६९ हजार ५३० रूपयांचा माल चोरून त्याची परस्पर विक्री केली होती. हा प्रकार सीसीटीव्हीतून समोर आल्यानंतर शिंदे यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार १५ मार्च रोजी गुन्ह्याची नोंद झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून एमआयडीसी पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर तो पुण्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला पु्ण्यातून अटक करण्यात आली आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून सरकार पक्षातर्फे ॲड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सुधीर साळवे, इमरान सैय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे आदींनी केली आहे. तर संशयित विशाल याच्याकडून ३० हजार रूपये हस्तगत करण्यात आले आहे.

Web Title: shop Worker is thief; arrested from Pune, Jalgaon crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.