आपट्यात दुकानांचे गाळे व मंदिरातील दानपेटी फोडून चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 12:32 AM2021-01-31T00:32:52+5:302021-01-31T00:33:14+5:30
आपटा गावातील दुकानांचे गाळे व दत्त मंदिरातील दानपेटी फोडून एकूण २८,४०० रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मोहोपाडा - आपटा गावातील दुकानांचे गाळे व दत्त मंदिरातील दानपेटी फोडून एकूण २८,४०० रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची घटना रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मौजे आपटा गावातील एकविरा, माउली इलेक्ट्रीक ॲण्ड हार्डवेअर शेजारील असलेल्या गाळाधारकांचे शटर लोखंडी वस्तूने वाकवून, तसेच गावातील श्रीदत्त मंदिरातील दरवाज्याचा कोयंडा तोडून दानपेटी फोडल्याची फिर्याद अशोक गणपत काठे (वय २०) यांनी दिली आहे.
यात चोरट्यांनी आपटा दत्त मंदिरातील स्टीलची दानपेटी फोडून २००० रुपये, गाळा नंबर १ दुकानातील काऊंटर ड्राव्हरमधील रोख रक्कम १०४००,गाळा नंबर २ दुकानाच्या काउंटर ड्राव्हरमधील रोख २०००,गाळा नंबर ३ काउंटर ड्राव्हरमधील १००० रुपये, गाळा नंबर ४ ड्राव्हरमधील ६५०० रुपये, गाळा नंबर ५ ड्राव्हरमधील रोख ३००० रुपये, गाळा नंबर ७ ड्राव्हरमधील ३००० रुपये असा एकूण २८४०० रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाले. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली असून पोलिसांची सुरक्षा वाढविण्याबरोबरच सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली जात आहे.