Video : तिथे दाखवा खाकीचा ज़ोर!...भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 08:08 PM2021-05-27T20:08:12+5:302021-05-28T09:59:05+5:30

Chitra Wagh's Reaction : या घडलेल्या एकूणच घटनेवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. 

Show Khaki's strength there!...Chitra Wagh's angry reaction after BJP Yuva Morcha office bearer was beaten to death by the police | Video : तिथे दाखवा खाकीचा ज़ोर!...भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया 

Video : तिथे दाखवा खाकीचा ज़ोर!...भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानंतर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया 

googlenewsNext
ठळक मुद्देचित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये कोरोना महामारीतही रोज स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत.

एका खासगी रूग्णालयात झालेल्या वादाची व्हिडिओ शुटिंग काढण्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील घटना ९ एप्रिल २०२१ रोजी घडलेली असून पदाधिकारी गयावया करत माफी मागत आहे तर पोलिस त्यास काठ्या तुटेपर्यंत मारहाण करत असल्याचे दिसत आहे.  शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घडलेल्या एकूणच घटनेवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. 

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये कोरोना महामारीतही रोज स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत. लोकांचे खुन होताहेत, तिथे दाखवा खाकीचा ज़ोर...गोरगरीबांवर जोर काढून काय साध्य करताय असा सवाल उपस्थित केला आहे. 

या घटनेबाबत कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन म्हणाले की, ९ एप्रिल रोजी एका खासगी रूग्णालयात अपघात झालेल्या व्यक्ती मरण पावला होता. त्यानंतर काही तरूणांनी येऊन रूग्णालयाची तोडफोड केली होती. जमाव पागविण्यासाठी आम्ही लाठीचार्ज केला होता, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन लाखांची लाच घेणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर दिसत आहे. शिवाय, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व कर्मचारी दिसत आहेत.

 

Web Title: Show Khaki's strength there!...Chitra Wagh's angry reaction after BJP Yuva Morcha office bearer was beaten to death by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.