Shraddha Murder Case: खळबळजनक! श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करताना आफताबच्या हाताला झाली जखम?, डॉक्टर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 10:41 AM2022-11-16T10:41:33+5:302022-11-16T10:49:32+5:30
Shraddha Murder Case: दिल्लीमधील जनरल सर्जन असणारे डॉक्टर अनिल सिंह यांनी आफताब मे महिन्यामध्ये आपल्याकडे आला होता असं सांगितलं आहे.
‘लिव्ह इन पार्टनर’च्या खुनामुळे देश हादरलेला असतानाच या प्रकरणात आता अनेक कंगोरे पुढे येत आहेत. मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एका डॉक्टरने आफताबसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेन दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमधील जनरल सर्जन असणारे डॉक्टर अनिल सिंह यांनी आफताब मे महिन्यामध्ये आपल्याकडे आला होता असं सांगितलं आहे. "मे महिन्यामध्ये तो माझ्या दवाखान्यात आला होता. त्याच्या उजव्या हाताच्या तळहाताजवळ जखम झाली होती आणि त्यासाठी टाके घालावे लागले होते. तो अस्वस्थ आणि आक्रमक दिसत होता" असं डॉक्टर अनिल यांनी सांगितलं. तसेच जखम कशी झाली याबद्दल डॉक्टर अनिल यांनी विचारलं असता फळं कापताना जखम झाली असं त्याने सांगितलं आणि निघून गेला.
Delhi | He visited me in May when needed stitches on his right forearm. He was restless, aggressive while talking. When asked he told he sustained injury while cutting fruits, left after taking prescription: Dr Anil Singh, Surgeon, who treated Shraddha murder case accused Aftab pic.twitter.com/GxaUIcyDe7
— ANI (@ANI) November 15, 2022
"तो फार आत्मविश्वास असल्यासारखं भासवत होता. एखाद्याची हत्या करुन तो आला आहे असं त्याच्या देहबोलीवरुन वाटत नव्हतं. तो इंग्रजीमध्ये बोलत होता. आफताबला झालेली जखम फार गंभीर नव्हती असंही डॉक्टरांनी सांगितलं. एकीकडे तो फार आत्मविश्वास दाखवत होता तरी त्याच्या बोलण्यातून अस्वस्थपणा जाणवत होता. आपण मुंबईहून दिल्लीत कामासाठी आलो आहोत, आयटी सेक्टरमध्ये काम करतो, चांगल्या पगारासाठी मुंबई सोडून दिल्लीत आलो आहोत असंही त्याने डॉक्टारांना सांगितलं.
मेमध्ये आफताबने दिल्लीत श्रद्धाची हत्या केली होती. त्यानंतर त्याच महिन्यात तो या डॉक्टरकडे उपचारांसाठी गेला होता. आफताबच्या तळहाताला कापलं होतं. त्यावर उपचार घेण्यासाठी तो डॉक्टरांकडे गेला होता. त्यामुळेच श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करतानाच आफताबला ही दुखापत झाली होती का? असा प्रश्न विचारला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. डेक्स्टर नावाच्या एका वेबसीरीज मध्ये दाखवलेली खुनाची पद्धत हादरवून सोडते. आफताबने यावरुनच प्रेरणा घेतली की काय अशीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ज्यांनी ही वेब सीरीज बघितली आहे ते सध्या सोशल मीडियावर याविषयी कमेंट करताना दिसत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"