Shraddha Walker Murder Case : 35 तुकडे करण्याआधी श्रद्धा-आफताबमध्ये भांडण; सापडला मोठा पुरावा, मिळाली ऑडिओ क्लिप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 01:11 PM2022-12-26T13:11:41+5:302022-12-26T13:40:15+5:30

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. या हत्येप्रकरणी आता दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.

shraddha murder case aftab and shraddha had fight before murder police got audio evidence | Shraddha Walker Murder Case : 35 तुकडे करण्याआधी श्रद्धा-आफताबमध्ये भांडण; सापडला मोठा पुरावा, मिळाली ऑडिओ क्लिप

Shraddha Walker Murder Case : 35 तुकडे करण्याआधी श्रद्धा-आफताबमध्ये भांडण; सापडला मोठा पुरावा, मिळाली ऑडिओ क्लिप

googlenewsNext

श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. या हत्येप्रकरणी आता दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. ऑडिओ पुरावे मिळाले आहेत. पोलिसांना आफताबचा एक ऑडिओ मिळाला आहे. यामध्ये आफताब श्रद्धासोबत भांडत आहे. या ऑडिओमध्ये आफताब आणि श्रद्धा यांच्यात वाद सुरू असल्याचं ऐकू येत आहे. इतकंच नाही तर आफताब श्रद्धाला टॉर्चर करत होता हे ऑडिओवरून सिद्ध होत आहे. दिल्ली पोलीस या ऑडिओला मोठा पुरावा मानत आहेत. 

या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा ऑडिओ हत्येचा नेमका हेतू शोधण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या ऑडिओशी आफताबचा आवाज जुळण्यासाठी पोलीस त्याच्या आवाजाचा नमुना घेणार आहेत. सीबीआयची सीएफएसएल टीम आफताबच्या आवाजाचा नमुना घेईल. आफताब सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. सीबीआय त्याला सोमवारी सकाळी 8 वाजता तिहार तुरुंगातून घेऊन जाईल. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची नार्को टेस्ट झाली आहे. यापूर्वी त्याला पॉलीग्राफ चाचणीलाही सामोरे जावं लागलं होतं. 

"आफताबने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले"

पोलिसांच्या चौकशीत आफताबनेच श्रद्धाची हत्या केल्याचं सांगितलं होतं. आफताब हा श्रद्धाचा प्रियकर होता. दोघेही मुंबईचे रहिवासी असून काही दिवसांपूर्वी ते दिल्लीला शिफ्ट झाले होते. दिल्लीत दोघेही मेहरौली येथे फ्लॅट घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आफताबने सांगितलं होतं की, 18 मे रोजी त्याचं श्रद्धासोबत भांडण झालं होतं. यानंतर त्याने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर आफताबने श्रद्धाच्या शरीराचे 35 तुकडे केले. आफताबने हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले होते. 

आफताबला 12 नोव्हेंबरला अटक 

दररोज रात्री तो श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. आफताबला 12 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. कुणाला तिच्या हत्येचा संशय येऊ नये म्हणून तो श्रद्धाचे सोशल मीडिया अकाउंट वापरत राहिला. आफताबने श्रद्धाच्या खात्यातून 54 हजार रुपयेही ट्रान्सफर केले होते. श्रद्धाचे मोबाइल लोकेशन आणि बँक खात्याच्या तपशीलाच्या मदतीने पोलीस आफताबपर्यंत पोहोचले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"आफताबचे 70 तुकडे करा, त्याने माझ्या मुलीचं ब्रेनव़ॉश केलं"

श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी यासंपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. "आफताबची प्रॉपर्टीवर नजर होती. त्याने माझ्या मुलीचं ब्रेनव़ॉश केलं. श्रद्धाला खूप समजावलं पण तिने ऐकलं नाही. आफताबचे 70 तुकडे करा" अशा शब्दांत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. आजतकला दिलेल्या Exclusive मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं आहे. मी खूप मोठं दु:ख सहन करत आहे. ज्याची कधी कल्पना देखील मी केली नव्हती, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या मुलीसोबत असं काही घडलं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण जेव्हा डीएनए सँपल मॅच झाले तेव्हा यावर विश्वास बसला. माझी मुलगी कधीतरी परत येईल अशी आशा होती असं विकास वालकर यांनी म्हटलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: shraddha murder case aftab and shraddha had fight before murder police got audio evidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.