Shraddha Murder Case: आफताबने श्रद्धाची पत्नी म्हणून करून दिली होती ओळख; तपासासाठी दिल्ली पोलिस वसईत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 08:51 AM2022-11-19T08:51:52+5:302022-11-19T08:52:19+5:30

Shraddha Murder Case: आफताब पूनावाला याने वसई पूर्वेकडे भाड्याने  घेतलेल्या घराच्या मालकाला श्रद्धाची ओळख पत्नी म्हणून करून दिली होती, अशी माहिती उघड झाली आहे.

Shraddha Murder Case: Aftab introduced herself as Shraddha's wife; Delhi Police Vasai for investigation | Shraddha Murder Case: आफताबने श्रद्धाची पत्नी म्हणून करून दिली होती ओळख; तपासासाठी दिल्ली पोलिस वसईत

Shraddha Murder Case: आफताबने श्रद्धाची पत्नी म्हणून करून दिली होती ओळख; तपासासाठी दिल्ली पोलिस वसईत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
नालासोपारा : श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांचे पथक शुक्रवारी सकाळी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात आले. दरम्यान, आफताब पूनावाला याने वसई पूर्वेकडे भाड्याने  घेतलेल्या घराच्या मालकाला श्रद्धाची ओळख पत्नी म्हणून करून दिली होती, अशी माहिती उघड झाली आहे.

दोघेही काही काळ वसईतील एव्हरशाइन येथे भाड्याने राहत होते. आरोपीने श्रद्धा ही आपली पत्नी असल्याची ओळख करून दिली होती. 
वसईत असताना श्रद्धा दोन दिवस रुग्णालयात दाखल होती. आफताबनेच तिला दाखल केले होते व हॉस्पिटलमधील फॉर्ममध्ये नातेवाईक म्हणून सही केल्याचे डॉ. अतुल पारसकर यांनी सांगितले. -  

आफताबची नार्को टेस्ट पाच दिवसांत पूर्ण करा
नवी दिल्ली : आफताबची पाच दिवसांत नार्को टेस्ट पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने शहर पोलिसांना दिले. पोलिसांना आरोपीवर कोणताही ‘थर्ड  डिग्री’चा उपाय वापरता येणार नाही, असेही स्पष्ट केले. अधिकाऱ्यांना पाच दिवसांच्या आत आरोपीची नार्को टेस्ट घेण्यास मुभा द्या, असे निर्देश महानगर न्यायदंडाधिकारी विजयश्री राठोड यांनी रोहिणी येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेला दिले. 

Web Title: Shraddha Murder Case: Aftab introduced herself as Shraddha's wife; Delhi Police Vasai for investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.