त्या दिवशी आफताब गुगलवर काय शोधत होता? श्रद्धाच्या हत्येतील आणखी एक गुढ समोर आले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 08:54 AM2022-11-18T08:54:42+5:302022-11-18T08:54:49+5:30

श्रद्धा वालकर हत्येसंदर्भात रोज नवीन खुलासे होत आहेत.  दक्षिण दिल्लीचे मेहरौली पोलीस स्टेशन आणि एफएसएल रोहिणी, जे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

shraddha murder case aftab kept shraddha head for five months was searching how to keep safe dead body on internet | त्या दिवशी आफताब गुगलवर काय शोधत होता? श्रद्धाच्या हत्येतील आणखी एक गुढ समोर आले

त्या दिवशी आफताब गुगलवर काय शोधत होता? श्रद्धाच्या हत्येतील आणखी एक गुढ समोर आले

googlenewsNext

श्रद्धा वालकर हत्येसंदर्भात रोज नवीन खुलासे होत आहेत.  दक्षिण दिल्लीचे मेहरौली पोलीस स्टेशन आणि एफएसएल रोहिणी, जे या प्रकरणाचा तपास करत आहेत, त्यांना आतापर्यंत सुमारे 20 हाडे सापडली आहेत. पण ती माणसाची आहे की प्राण्याची आहे हे अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणात गुरुवारीही पोलिसांनी छतरपूरच्या जंगलातील राखेचा शोध घेतला. तेथून काही जप्त करण्यात आले असून, पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावाला याला पाच दिवसांची कोठडी मिळाली. त्याची नार्को चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे.

श्रध्दाची हत्या केल्यानंतर आफताबने तिच्या मृतदेहाचे सुमारे 20 तुकडे केले होते, अशी माहिती या प्रकरणात मिळाली आहे. शीर आणि इतर अवयवांची सुमारे पाच महिन्यांनी म्हणजे ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच विल्हेवाट लावण्यात आली. आफताबने शीर व इतर भाग फ्रीजमध्ये ठेवले होते. त्याने दुर्गंधी येऊ नये म्हणून त्यामध्ये काही रसायनाचा वापरही केला होता.

मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी आरोपीने इंटरनेटवर खूप शोध घेतला. मृतदेहाचे सर्व अवयव पॅक करून फ्रीजमध्ये ठेवले होते. मृतदेह कट करण्यासाठी त्याने करवत, चाकू आणि चॉपरचा वापर केला. गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेह बाथरूममध्ये कापून टाकला होता. मृतदेह कट करत असताना आरोपी नळ चालू ठेवत होता, असंही समोर आले आहे. 

दक्षिण दिल्ली पोलीस श्रद्धाच्या कापलेल्या शीराचा शोध घेत आहेत. आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने श्रद्धाचा मृतदेह छतरपूरच्या जंगलात फेकून दिला होता. त्यामुळे पोलीस रोज छतरपूरच्या जंगलात जाऊन मृतदेह शोधत आहेत. यासाठी पोलिसांनी श्वानपथकाचीही मदत घेतली, मात्र अजुनही शीर सापडलेले नाही. पोलिसांचे पथक गुरुवारी पुन्हा छतरपूरच्या जंगलात पोहोचले, तेथे दाट झाडी तोडण्यात आली होती. पोलिसांनी येथून काहीतरी जप्त केल्याचे सांगण्यात  येत आहे. या प्रकरणी पोलिसांना काही मोठे पुरावे मिळाले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आफताबने पोलिसांना सांगितले की, त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते मेहरौली परिसरात सुमारे चार किलोमीटरच्या परिघात फेकून दिले. बहुतेक भाग छतरपूरच्या जंगलात फेकले गेले. यानंतर मृतदेहाचे अवयव स्मशानभूमीजवळील नाल्यात, एमबी रोड 100 फूट आणि पॅडी मिल कंपाऊंडच्या मागील बाजूस टाकण्यात आले.

आरोपी आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दक्षिण दिल्ली पोलिसांना मिळाली आहे. मात्र, कायदेशीर प्रक्रियेदरम्यान आरोपीची मान्यता घेणेही आवश्यक असते. नार्को चाचणीत त्याला सोडियम पेंटोथलने भरलेले इंजेक्शन दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याला ट्रुथ सीरम असेही म्हणतात. ते दिल्याने आरोपी सौम्य बेशुद्धावस्थेत येतो. यानंतर डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ आणि एफएसएल तज्ज्ञांचे पथक आरोपींना पोलिसांनी दिलेले प्रश्न विचारतील. ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे एक तास चालते. ज्यामध्ये पोलिसांना आरोपींकडून मोठ्या प्रमाणात अधिक माहिती मिळण्याची शक्यता असते.

Web Title: shraddha murder case aftab kept shraddha head for five months was searching how to keep safe dead body on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.