श्रद्धा हत्याकांड: आफताबला ताप भरला; आजही पॉलिग्राफ चाचणी अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 10:40 PM2022-11-24T22:40:06+5:302022-11-24T22:40:55+5:30

मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला.

Shraddha murder case: Aftab poonavala gets fever; Even today the polygraph test is incomplete | श्रद्धा हत्याकांड: आफताबला ताप भरला; आजही पॉलिग्राफ चाचणी अपूर्णच

श्रद्धा हत्याकांड: आफताबला ताप भरला; आजही पॉलिग्राफ चाचणी अपूर्णच

googlenewsNext

श्रद्धा वालकर मर्डर केसमध्ये तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याची आजही पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण होऊ शकली नाही. आफताबचे दोन राऊंड पूर्ण झाले असून जवळपास ८ तासांनी आफताब रोहिणीच्या FSL लॅबमधून बाहेर आला. आफताबला आजही ताप आल्याने त्याची चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. 

मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. या प्रकरणात आफताब दररोज वेगवेगळ्या गोष्टी सांगत असल्याने तो खरे बोलतोय का, य़ाची माहिती मिळविण्यासाठी त्याची ब्रेन मॅपिंग टेस्ट घेतली जात आहे. 

मंगळवारपासून त्याची पॉलिग्राफ टेस्ट केली जात आहे. बुधवारी देखील आफताबला ताप आला होता, यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. आता उद्या शुक्रवारी त्याची पुन्हा टेस्ट होण्याची शक्यता आहे. 
महाराष्ट्रातील ठाणे (ग्रामीण) भाईंदर खाडी परिसरात दिल्ली पोलिसांचे पथक पुरावे शोधत आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी आफताबने आपल्या वसई येथील घरातून 37 बॉक्स हे दिल्लीला पाठवले होते. या 37 बॉक्समध्ये नेमकं काय सामान होतं याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून त्याने बॉक्स दिल्लीला पाठवले होते. तसेच त्यासाठी पैसेही दिले होते. 

Web Title: Shraddha murder case: Aftab poonavala gets fever; Even today the polygraph test is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.