Shraddha Murder Case ३५ तुकडे आणि अवयवाची विल्हेवाट, आफताबने 'या' वेबसीरीजमधुन घेतली प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 03:13 PM2022-11-15T15:13:11+5:302022-11-15T15:27:35+5:30

रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले. त्याने केलेला हा खून कोणत्या चित्रपटाच्या किंवा वेब सीरिजच्या कहाणीपेक्षा काही कमी नाही. आणि ते खरेही आहे.

Shraddha-murder-case-aftab-took-learnt-from-english-web-series-called-dexter | Shraddha Murder Case ३५ तुकडे आणि अवयवाची विल्हेवाट, आफताबने 'या' वेबसीरीजमधुन घेतली प्रेरणा

Shraddha Murder Case ३५ तुकडे आणि अवयवाची विल्हेवाट, आफताबने 'या' वेबसीरीजमधुन घेतली प्रेरणा

googlenewsNext

Shraddha Murder Case : दिल्लीतील एका Murder खूनाच्या प्रकरणाने संपू्र्ण देशाला हादरवले आहे. मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर  हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. त्याने केलेला हा खून कोणत्या चित्रपटाच्या किंवा वेब सीरिजच्या कहाणीपेक्षा काही कमी नाही. आणि ते खरेही आहे. डेक्स्टर नावाच्या एका वेबसीरीज मध्ये दाखवलेली खुनाची पद्धत हादरवून सोडते. आफताबने यावरुनच प्रेरणा घेतली की काय अशीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ज्यांनी ही वेब सीरीज बघितली आहे ते सध्या सोशल मीडियावर याविषयी कमेंट करताना दिसत आहेत.

Dexter डेक्सटर सीरीजमध्ये नक्की काय आहे ?

२००६ ते २०१३ मध्ये डेक्सटर ही अमेरिकन वेब सीरीज प्रदर्शित झाली होती. यातील डेक्सटर नावाचे प्रमुख पात्र दाखवले आहे. हा ३ वर्षांचा असतानाच अनाथ होतो. एक पोलिस अधिकारी त्याला दत्तक घेतो. आपल्या जन्मदात्या आईची हत्या बघून त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो. पोलिस अधिकाऱ्याला जेव्हा हे कळते तेव्हा अशा आरोपींचा खून करण्यासाठी तो डेक्सटरची मदत करतो. ज्या ठिकाणी तो खून करतो ती जागा पुर्णपणे प्लॅस्टिकने बंद करतो. खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन ते अटलांटिक महासागरात फेकून देतो. अंगावर शहारे आणणारे असे सीन्स यामध्ये दाखवण्यात आले आहेत. ८ सीझन्स मध्ये ही वेब सीरीज बनवण्यात आली आहे.

"मला बाहेर काढा, नाहीतर तो आज रात्रीच माझा जीव घेईल..", दुर्दैवाने श्रद्धाची भिती खरी ठरली

आफताब ने अशा पद्धतीने श्रद्धाचा खून करुन पुरावे लपवण्यासाठी तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले. हे तुकडे लपवण्यासाठी त्याने एक फ्रीज घेतला आणि त्यात ठेवले. १८ दिवस तो रोज मध्यरात्री २ वाजता एक एक अवयव घेऊन जंगलात फेकत होता.मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून तो उद्बत्ती लावायचा. 

Web Title: Shraddha-murder-case-aftab-took-learnt-from-english-web-series-called-dexter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.