Shraddha Murder Case: तुरूंगातही जाळं पसरवून खेळ खेळत आहे आफताब, अधिकारीही बघून झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 12:18 PM2022-12-02T12:18:29+5:302022-12-02T12:19:15+5:30
Shraddha Murder Case Update: आफताब बुद्धीबळाचा हुशार खेळाडू आहे. अशा खेळाडू जो स्वत:ची चाल स्वत: विरोधात चालतो. म्हणजे तो दोन्ही बाजूने खेळतो.
Shraddha Murder Case Update: श्रद्धा मर्डर केसचा आरोपी आफताबच्या जीवनातील रहस्य हळूहळू समोर येत आहेत. मग ते श्रद्धाची हत्या करणं असो वा एकानंतर एक नवीन गर्लफ्रेंड बदलणं असो. आफताबच्या जीवनाशी आणखी एक रहस्य तुरूंगातून समोर आलं आहे. हे असं रहस्य आहे जे बघून तुरूंगातील अधिकारी देखील हैराण झाले आहेत. आफताब बुद्धीबळाचा हुशार खेळाडू आहे. अशा खेळाडू जो स्वत:ची चाल स्वत:च्या विरोधात चालतो. म्हणजे तो दोन्ही बाजूने खेळतो.
दिल्ली पोलिसांना आधीपासून संशय होता की, आफताब खूप हुशार आहे. त्याचं प्रत्येक पाउल एक षडयंत्र वाटतं. म्हणजे दोन्हीकडून तो एकटा खेळतो. एका अधिकाऱ्याने तर असंही सांगितलं की, पोलिसांना वाटतं की, चौकशी अधिकारी आम्ही नाही तर आफताब आहे. ज्याच्या इशाऱ्यावर दिल्ली पोलीस फिरत आहेत. म्हणजे तो दिल्ली पोलिसांना त्याच्यानुसार फिरवत आहे.
हेच कारण आहे की, चौकशीदरम्यान पोलिसांनी या आरोपीचा मेंदू वाचण्यासाठी सायकॉलॉजिस्टची मदत घेतली आणि आता नार्को टेस्ट केली. म्हणजे त्याच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. आफताबसोबत सेलमध्ये इतर दोन कैद्यांना ठेवण्यात आलं आहे. ज्यांना आफताबवर 24 तास नजर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
इतकंच नाही तर आफताबवर तुरूंगात आत धोका ओळखून तुरूंगातील अधिकाऱ्यांनी त्याच्या आजूबाजूला खास सुरक्षा ठेवली आहे. आफताब ना कुणाशी जास्त बोलतो ना काही. अधिकाऱ्यांनुसार, आफताब वेळेवर जेवतो आणि वेळेवर झोपतो. जणू त्याला काही पश्चातापच नाही.