Shraddha Murder Case: मृतदेहाचे शिर न मिळताही होऊ शकते फाशी..., श्रद्धाच्या खुनाचा तपास ११ पुराव्यांनुसार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 07:01 AM2022-11-19T07:01:51+5:302022-11-19T07:02:49+5:30
Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्येतील आरोपी आफताब पकडला गेला असला, तरी ना खुनासाठी वापरलेले शस्त्र सापडले ना श्रद्धाचे शिर. अशा स्थितीत आफताबने कबुलीजबाब फिरविला तर काय होईल?
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्येतील आरोपी आफताब पकडला गेला असला, तरी ना खुनासाठी वापरलेले शस्त्र सापडले ना श्रद्धाचे शिर. अशा स्थितीत आफताबने कबुलीजबाब फिरविला तर काय होईल?
याबाबत उ. प्रदेशचे माजी पोलिस महासंचालक विक्रम सिंह म्हणाले की, आफताबने स्वतः डेथ वॉरंटवर सही केली. मृतदेह गायब केल्याने किंवा खुनासाठी वापरलेले शस्त्र लपवून ठेवल्याने आपण वाचू, असे त्याला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. त्याच्याविरुद्ध असे पुरावे आहेत की, जे त्याला फासावर नेऊ शकतात.
शोधमोहीम सुरू...
दिल्ली पोलिसांच्या पथकाने गुरूग्राममधील एका खासगी कंपनीच्या कार्यालयात व आसपासच्या परिसरात शोधमोहीम राबवली. कार्यालयाच्या आजूबाजूला असलेल्या झाडाझुडपांतून जप्त केलेल्या वस्तू पोलिसांनी नेल्या.