Breaking: जंगलातील मृतदेहाचा अवेशष श्रद्धाचाच; डीएनए चाचणीत स्पष्ट, पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

By मुकेश चव्हाण | Published: November 26, 2022 11:18 AM2022-11-26T11:18:24+5:302022-11-26T11:18:32+5:30

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

Shraddha Walker Murder Case: A DNA test of Shraddha Walker bones and her father's has been a match. | Breaking: जंगलातील मृतदेहाचा अवेशष श्रद्धाचाच; डीएनए चाचणीत स्पष्ट, पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

Breaking: जंगलातील मृतदेहाचा अवेशष श्रद्धाचाच; डीएनए चाचणीत स्पष्ट, पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

googlenewsNext

नवी दिल्ली/मुंबई- श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची प्रकृती ठीक नसल्याने रखडलेली पॉलिग्राफ चाचणी गुरुवारी पार पडली. मात्र, त्याला सर्दी झाल्याने, सतत शिंका येत असल्याने ती पूर्ण होऊ शकली नाही. ती शुक्रवारी पुढे सुरु राहिली. कदाचित उद्याही ही चाचणी केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

चाचणीत आफताब त्याच्या आणि श्रद्धाच्या संबंधांबाबत थोडी परस्परविरोधी माहिती दिल्याने सोमवारच्या चाचणीतील त्याच्या उत्तराकडे लक्ष लागले आहे. आफताबच्या चाचणीसाठी पाचजणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात दोन मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे, तर दोघे त्याच्या चाचणीच्या तपशीलवार रेकॉर्डिंगवर लक्ष ठेवत आहेत. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

अधिकाऱ्यांचा तो एक प्रश्न अन् आफताब लगेच पाणी मागू लागला; चौकशीत काय घडलं?

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी मोठी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. श्रद्धाच्या हाडांची आणि वडिलांच्या रक्ताची डीएनए चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत जंगलातील मृतदेहाचा अवेशष श्रद्धाचाच असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांना आफताबच्या विरोधात न्यायालयात सादर करण्यासाठी मोठा पुरावा मिळाला आहे. 

दरम्यान, रोहिणीच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आफताबची पॉलीग्राफी चाचणी सुरु झाल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. श्रद्धासोबतच्या नात्यावर प्रश्न विचारताच तो थोडा अस्वस्थ झाला व पाणी मागू लागला. त्यानंतर आफताबने शांतपणे उत्तरे दिली. त्याच्यावर कोणताही ताण नव्हता, तो शांतपणे चाचणीला सामोरा गेला. चाचणीत त्याला ४० ते ५० प्रश्न विचारण्यात आले. नियोजित पद्धतीने हत्या केली की रागातून? मृतदेहाचे तुकडे करण्याचा व फेकण्याचा निर्णय का घेतला? मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला? शस्त्रे कुठे लपविली? हे प्रश्न त्याला विचारले. हे प्रश्न हिंदीत विचारले आणि त्याने याची इंग्रजीतून उत्तरे दिल्याचेही कळते.

बद्रीही संशयाच्या भोवऱ्यात

छत्तरपूर पहाडीच्या जंगलात आडबाजूला आफताबला घर भाड्याने देणारा त्याचा मित्र बद्रीही संशयाच्या भोवऱ्यात असून, पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. याच घराजवळच्या जंगलाच्या भागात श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले होते, आफताब आणि श्रद्धाची हिमाचल प्रदेशात ब्रदीशी ओळख झाली होती. त्यानंतर ब्रदीने आफताबला घर भाड्याने दिले होते. त्याला हत्येची कल्पना होती, त्याचा सहभाग आहे का याबाबत चौकशी होणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Read in English

Web Title: Shraddha Walker Murder Case: A DNA test of Shraddha Walker bones and her father's has been a match.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.