Shraddha Walker Murder Case: आफताबची सुटका होणार?; न्यायालयात घेतली धाव, उद्या होणार सुनावणी, देशाचं लागलं लक्ष...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 01:16 PM2022-12-16T13:16:03+5:302022-12-16T15:13:16+5:30
Shraddha Walker Murder Case: आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली असून तो सध्या तिहारच्या कोठडीत आहे.
नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. पोलीस आरोप आफताब पुनावालाची कसून चौकशी करत आहेत.
महिला तुरुंग अधिकारी कैद्याच्या प्रेमात; किसच्या बदल्यात..., अधिकारीही पडले बुचकळ्यात!
आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली असून तो सध्या तिहारच्या कोठडीत आहे. आज आफताबने दिल्लीतील साकेत न्यायालयात जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या म्हणजेच १७ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मात्र आफातबला जामीन मिळणे अशक्य असल्याचं बोललं जात आहे. कारण कालच पोलिसांना आफतोबविरोधात एक भक्कम पुरावा हाती लागला आहे.
Shraddha murder case | Accused Aftab Poonawala has moved an application in Delhi's Saket Court seeking bail in the matter. He is in judicial custody after police interrogation. His bail plea will be heard tomorrow.
— ANI (@ANI) December 16, 2022
श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या तपासात दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मेहरौलीच्या जंगलातून पोलिसांना सापडलेल्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत जंगलात सापडलेली हाडं, केस आणि रक्त यांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला आहे. सीएफएसएलच्या अहवालात याची पुष्टी झाली आहे.
आफताब पुरता अडकला; श्रद्धाच्या जंगलात सापडलेल्या हाडांनी भक्कम पुरावा दिला...!
दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक करून चौकशी केली. यानंतर पोलिसांनी मेहरौली जंगल आणि गुरुग्राममध्ये त्याने नमूद केलेल्या ठिकाणाहून हाडांच्या रूपात मृतदेहाचे अनेक तुकडे जप्त केले होते. पोलिसांना मानवी जबड्याचे हाडही सापडले होते. या सगळ्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सीएफएसएल लॅबला पाठवले होते. त्याचा आज अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून सापडलेल्या हाडांचा डीएनए श्रद्धाच्या वडिलांच्या डीएनएशी जुळला आहे. त्यामुळे आतापर्यंतचा आफताबविरोधात मोठा पुरावा मिळाल्याचं सांगण्यात येत आहे.
१८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर बॅन आणावा- श्रद्धाचे वडील
माझ्या मुलीसोबत जे झाले, असं कोणासोबतही होऊ नये, अशी माझी अपेक्षा असल्याचं श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी बोलावून दाखवलं. तसेच १८ वर्षांनंतर स्वातंत्र्य दिले जाते, यावर विचार व्हावा, अशी मागणी देखील विकास वालकर यांनी केली आहे. तसेच मी आता मोठी झाली आहे. त्यामुळे मी माझा निर्णय घेऊ शकते. मी आता काहीही करु शकते, असं श्रद्धा घर सोडताना म्हणाली होती. मात्र आजच्या युगाचा विचार करता, १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर बॅन आणण्याबाबत विचार करण्याची गरज असल्याची मागणी विकास वालकर यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"