श्रद्धाचे 35 तुकडे करणारा आफताब बनला 'गजनी', म्हणाला- 'मला काही आठवत नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 05:35 PM2022-11-22T17:35:02+5:302022-11-22T17:35:09+5:30

श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने आज कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

Shraddha Walker Murder Case: Aftab Poonawala said, he does not remember anything | श्रद्धाचे 35 तुकडे करणारा आफताब बनला 'गजनी', म्हणाला- 'मला काही आठवत नाही...'

श्रद्धाचे 35 तुकडे करणारा आफताब बनला 'गजनी', म्हणाला- 'मला काही आठवत नाही...'

Next

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील खळबळजनक श्रद्धा हत्याकांडात आज अनेक मोठे अपडेट्स समोर आले. आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने सकाळी 10 वाजता दिल्लीच्या कोर्टात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. श्रद्धाच्या दबावामुळे राग आला आणि रागाच्या भरातच खून केला, असे सांगून त्याने प्रकरणाला नवीन वळण दिले. रागाच्या भरात गुन्हा केल्याचे सांगून, त्याने प्रकरण सौम्य करण्याचा प्रयत्न केला आहे. 

आफताब झाला गजनी
दरम्यान, कोर्टात आफताब 'गजनी'च्या अभिनेत्याप्रमाणे विसरायला लागला आहे. त्याने म्हटले की, 6 महिन्यांपूर्वी त्याने हत्या केली, आता त्याला सर्वकाही आठवत नाही. सध्या श्रद्धाच्या शरीराचे अवयव, शस्त्रे आदींबाबत आफताबची चौकशी केली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आफताबला आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने रागाच्या भरात गुन्हा केल्याचे सांगून, गुन्ह्याला सदोष मनुष्यवधाच्या खटल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, लवकरच आफताबच्या संमतीनेच पॉलीग्राफ चाचणी करण्यात येणार आहे.

आजच्या सुनावणीदरम्यान आफताबने हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचे ठिकाण सांगितले. मी पोलिसांना सहकार्य करत असल्याचे त्याने न्यायाधीशांना सांगितले. गुरुग्राम DLF फेज-3 च्या झुडपात अवयव कापण्यासाठी वापरलेली करवत फेकल्याचे तो म्हणाला. दरम्यान, आफताबच्या फ्लॅटमधील बाथरूममधून रक्ताचे डाग आढळून आल्याचा दावा आहे. याशिवाय, अनेक हाडेही सापडल्याचे वृत्त आहे. आता पोलिसांनी आपल्या तपासाचा वेग वाढवला आहे. 

Web Title: Shraddha Walker Murder Case: Aftab Poonawala said, he does not remember anything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.