Shraddha Walker Murder Case:आफताबचे वडील अमीन पूनावाला दिल्ली पोलिसांच्या रडारवर, त्यांना हत्येची माहिती होती का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 06:02 PM2022-11-26T18:02:40+5:302022-11-26T18:03:47+5:30

मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत. हत्तेतील आरोपी आफताब पूनावाला याचे वडील अमीन पूनावाला दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत.

Shraddha Walker Murder Case Aftab's father Amin Poonawa on Delhi Police's radar, did he know about the murder | Shraddha Walker Murder Case:आफताबचे वडील अमीन पूनावाला दिल्ली पोलिसांच्या रडारवर, त्यांना हत्येची माहिती होती का?

Shraddha Walker Murder Case:आफताबचे वडील अमीन पूनावाला दिल्ली पोलिसांच्या रडारवर, त्यांना हत्येची माहिती होती का?

googlenewsNext

मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी रोज नवे खुलासे होत आहेत. हत्तेतील आरोपी आफताब पूनावाला याचे वडील अमीन पूनावाला दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. या हत्येप्रकरणी श्रद्धाने २०२० साली पोलिसांना दिलेले तक्रार पत्र समोर आले आहे. या पत्रानंतर आता दिल्ली पोलिसांना आफताब वडिल अमीन पूनावाला त्यांच्या सतत संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून रोजी आफताब पॅकर्स अँड मुव्हर्स एजन्सीद्वारे वसईहून दिल्लीला आपले सामान हलवत असताना, त्यावेळी तो आपल्या वडिलांना आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेला होता का, असाही संशय पोलिसा्ंना आहे. वडिलांनी सामान हलवायला मदत केली का? या गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत. (Shraddha Walker Murder Case)

Shraddha Walker Murder Case: 'मला आफताबने बोलावलेलं', ती मुलगी मानसशास्त्रज्ञ निघाली; श्रद्धाच्या मृत्यूनंतर आली होती घरी!

श्रद्धाचे तक्रार पत्र समोर आल्यानंतर, आफताबचे वडील आणि इतर कुटुंबीयांना आफताबच्या गुन्ह्याची माहिती नव्हती का, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. आफताबला ड्रग्जचे व्यसन होते आणि त्यासाठी तो वसई, मीरा रोड आणि भाईंदरच्या ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात होता, याचा तपासही पोलीस करत आहेत. 

'मला आफताबने बोलावलेलं', ती मुलगी मानसशास्त्रज्ञ निघाली; श्रद्धाच्या मृत्यूनंतर आली होती घरी!

 

 श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची प्रकृती ठीक नसल्याने रखडलेली पॉलिग्राफ चाचणी गुरुवारी पार पडली. मात्र, त्याला सर्दी झाल्याने, सतत शिंका येत असल्याने ती पूर्ण होऊ शकली नाही. ती शुक्रवारी पुढे सुरु राहिली. कदाचित उद्याही ही चाचणी केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

चाचणीत आफताब त्याच्या आणि श्रद्धाच्या संबंधांबाबत थोडी परस्परविरोधी माहिती दिल्याने सोमवारच्या चाचणीतील त्याच्या उत्तराकडे लक्ष लागले आहे. आफताबच्या चाचणीसाठी पाचजणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात दोन मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे, तर दोघे त्याच्या चाचणीच्या तपशीलवार रेकॉर्डिंगवर लक्ष ठेवत आहेत. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

आफताबची २० पेक्षा जास्त महिलांसोबत मैत्री होती. या सर्वांसोबत एका डेटिंग अ‍ॅपवरुन मैत्री झाली होती. तसेच यामधील अधिक महिलांसोबत त्यांने शारिरीक संबंध ठेवले होते. स्वत: आफताबने याबाबत खुलासा केला होता. आफताबच्या या दाव्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलांची माहिती संबंधित डेटिंग अ‍ॅपकडून मागितली होती. यानंतर पोलिसांनी एक मुलीची चौकशी देखील केली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर संबंधित मुलगी आफताबच्या घरी आली होती. आफताबनेच तिला फोन करुन घरी बोलावले होते, अशी माहिती तिने पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे संबंधित मुलगी एक मानसशास्त्रज्ञ असल्याचं समोर आलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Shraddha Walker Murder Case Aftab's father Amin Poonawa on Delhi Police's radar, did he know about the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.