Shraddha Walker Murder Case : आफताबने श्रद्धाला सिगारेटचे चटके दिले...; मित्राचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 05:02 PM2022-11-24T17:02:44+5:302022-11-24T17:07:21+5:30

मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आरोपी आफताबची काल २३ नोव्हेंबर रोजी पॉलीग्राफी चाचणी होणार होती, पण प्रकृती खालावल्याने होऊ शकली नाही.

Shraddha Walker Murder Case big revelation from Shraddha's friend | Shraddha Walker Murder Case : आफताबने श्रद्धाला सिगारेटचे चटके दिले...; मित्राचा मोठा खुलासा

Shraddha Walker Murder Case : आफताबने श्रद्धाला सिगारेटचे चटके दिले...; मित्राचा मोठा खुलासा

googlenewsNext

मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. आरोपी आफताबची काल २३ नोव्हेंबर रोजी पॉलीग्राफी चाचणी होणार होती, पण प्रकृती खालावल्याने होऊ शकली नाही. आज आफताबची पॉलीग्राफी चाचणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता श्रद्धाच्या दोन मित्रांनी आफताब आणि श्रद्धाच्या नात्याबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत.

श्रद्धाच्या मित्राने या संदर्भात माहिती दिली आहे. "तो आफताबला कधीच भेटला नव्हता पण 23 नोव्हेंबर 2020 रोजी तो त्याला गॉडविनच्या माध्यमातून भेटला. त्यादरम्यान श्रद्धाच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि कमरेवर जखमेच्या खुणा होत्या. यावेळी आम्ही श्रद्धाला पोलीस ठाण्यात घेऊन गेलो. तिने स्वतः आफताबविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली, असंही श्रद्धाच्या मित्राने सांगितले. 

श्रद्धा वालकर हत्याकांड : दिल्लीचे पोलिस वसईतच तळ ठोकून, आतापर्यंत १३ जणांची झाली चौकशी 

यात श्रद्धाने आफताब मला मारेल असं लिहिले होते. तसेच त्याने माझ्यावर दोन-तीन वेळा हल्ला केला, असंही होते. दरम्यान यावेळी ती डिप्रेशनमध्ये असल्याचं दिसत होतं. तिला मोकळेपणाने बोलता येत नव्हते. मात्र, श्रध्दाने स्वत: त्याला पत्र लिहून पोलिसांत तक्रार केली होती, असंही त्याने सांगितले. 

"मी श्रद्धाला गॉडविनच्या माध्यमातून ओळखत होतो. श्रद्धाने नंतर तिची तक्रार का मागे घेतली, यावर त्याने सांगितले की, मला माहिती नाही की तिने तक्रार मागे घेतली आहे. त्याने 2021 मध्ये श्रद्धाला शेवटचे पाहिले होते, असंही श्रद्धाचा मित्र म्हणाला. 

श्रद्धाने आफताबला एक संधी दिली

"2015 ते 2018 या काळात आम्ही एकत्र कॉलेजला जायचो. आमची शेवटची भेट 2019 मध्ये झाली होती. मला आधी वाटले की ती माझ्यासोबत बोलत नाही, पण नंतर समजले की ती आफताबसोबत राहते आणि त्याने श्रद्धाला तिच्या सर्व मित्रांशी बोलण्यास मनाई केली आहे. आफताबने श्रद्धाला शालेय मित्र, कॉलेजचे मित्र तसेच कुटुंबातील सदस्यांपासून दूर ठेवले होते, असा खुलासा तिच्या मित्राने केला. 
 

Web Title: Shraddha Walker Murder Case big revelation from Shraddha's friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.