Shraddha Walker Murder Case: श्रद्धा हत्याकांड: दिल्ली पोलिसांना मोठे यश; जंगलातून कवटी, जबड्याचा भाग सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 08:58 PM2022-11-20T20:58:28+5:302022-11-20T21:06:29+5:30

रविवारी पहाटे दिल्ली पोलिसांचे पथक आरोपी प्रियकर आफताब याला छतरपूर पहारी भागात त्याच्या घरी घेऊन गेले होते. पथक निघेपर्यंत निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात करण्यात आले होते.

Shraddha Walker Murder Case: Big Success for Delhi Police; Skull, part of jaw found in forest | Shraddha Walker Murder Case: श्रद्धा हत्याकांड: दिल्ली पोलिसांना मोठे यश; जंगलातून कवटी, जबड्याचा भाग सापडला

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा हत्याकांड: दिल्ली पोलिसांना मोठे यश; जंगलातून कवटी, जबड्याचा भाग सापडला

googlenewsNext

श्रद्धा वालकर हत्याकांडात दिल्ली पोलिसांना आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. रविवारी २०० पोलिसांना घेऊन दिल्ली पोलिसांनी महरौलीचे जंगल पिंजून काढले. यामध्ये पोलिसांना मानवी कवटी आणि जबड्याचा काही भाग सापडला आहे. याचबरोबर शरीराची काही हाडे देखील सापडली आहेत.  पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे तुकडे २७ वर्षीय श्रद्धाचे असू शकतात. फॉरेन्सिक लॅबमध्ये याची तपासणी होऊ शकते, यानंतर ठोस काही सांगता येणार आहे. 

 मोठी अपडेट! आफताबने श्रद्धाचे शीर फेकलेले ठिकाण सापडले; दिल्ली पोलीस तलावाचे पाणी उपसताहेत...

रविवारी दिल्ली पोलिसांचे पथक आरोपी प्रियकर आफताब याला छतरपूर पहारी भागात त्याच्या घरी घेऊन गेले होते. याच घरात त्याने श्रद्धाचा खून केला होता. रविवारी पहाटे आफताबच्या घरी तपासासाठी पोहोचलेले पोलिस आणि एफएसएलचे पथक तासाभराच्या तपासानंतर दुपारी दोनच्या सुमारास बाहेर पडले. यावेळी पोलिस पथकाने घरातील अनेक वस्तू गाडीत ठेवून सोबत नेल्या. 
घरात गेल्यापासून ते पथक निघेपर्यंत निमलष्करी दल आणि दिल्ली पोलिसांचे जवान तैनात करण्यात आले होते. दुसरीकडे सुमारे 200 पोलिसांचे पथक शोध मोहिमेसाठी मेहरौलीच्या जंगलात गेले होते. पोलिसांच्या पथकाने जंगलातून काही अवशेष आणि चिरलेली हाडे जप्त केली आहेत. 

आफताबने श्रद्धाचे शीर एका तलावात फेकल्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलीस आणि महापालिकेची टीम आज दिवसभर एक मोठे तलाव रिकामे करण्याच्या कामी लागली आहे. छतरपुर एनक्लेव येथील या तलावात आफताबने श्रद्धाचे शीर फेकले होते. आता ते शोधण्यासाठी पोलीस हे तलाव उपसत आहेत. 

दिल्ली पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारचे १७ हाडांचे तुकडे सापडले आहेत. ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हाडांचे तुकडे पाहून फॉरेन्सिक एक्स्पर्टचे म्हणणे आहे की ते मानवाचेच आहेत. ती हाडे श्रद्धाचीच आहेत हे सिद्ध करणे आता एक मोठे आव्हान बनले आहे. त्यासाठी डीएनए टेस्टिंगही केली जात आहे. या हाडांमध्ये जांघेतील हाड देखील आहे. या हाड़ांवर धारधार हत्याराने कापल्याचेही दिसत आहे.
 

Web Title: Shraddha Walker Murder Case: Big Success for Delhi Police; Skull, part of jaw found in forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.