Shraddha Walker Murder Case:'त्याने खूप मारहाण केली, बेडवरुन उठू शकत नाही...' श्रद्धाच्या चॅटिंगमधून धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 05:09 PM2022-11-18T17:09:49+5:302022-11-18T17:30:11+5:30

Shraddha Walker Chat: श्रद्धा मर्डर केसमध्ये दररोज नवनवीन खुलासे होते आहेत. आता आफताब श्रद्धाला जबर मारहाण करायचा, हेही सिद्ध झाले आहे.

Shraddha Walker Murder Case: 'He beat a lot, can't get out of bed...' Shraddha's chat leaked | Shraddha Walker Murder Case:'त्याने खूप मारहाण केली, बेडवरुन उठू शकत नाही...' श्रद्धाच्या चॅटिंगमधून धक्कादायक खुलासे

Shraddha Walker Murder Case:'त्याने खूप मारहाण केली, बेडवरुन उठू शकत नाही...' श्रद्धाच्या चॅटिंगमधून धक्कादायक खुलासे

googlenewsNext

Shraddha Walker New Chat Viral: मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहे. दिल्ली पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला असून, आफताबने चौकशीत अनेक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. आता आफताब अमीन पूनावालाची चौकशी करण्यासाठी नार्को टेस्ट होणार आहे. यातच आता श्रद्धाची चॅटिंग लिक झाली आहे, ज्यात तिने आफताबने जबर मारहाण केल्याचे म्हणत आहे.

श्रद्धाची मित्रासोबत चॅटिंग
श्रद्धाने 24 नोव्हेंबर 2020 आपल्या मित्रासोबच व्हॉट्सअॅपवर चॅटिंग केली होती. या चॅटिंगमध्ये श्रद्धीने ती किती हतबल आहे, हे सांगिले होते. श्रद्धाने चॅटिंगमध्ये म्हटले होते की, आफताब लवकरच घर सोडून जाणार आहे. यात श्रद्धाने आफताबची क्रूरताही सांगितली. आफताबने श्रद्धाला इतकी मारहाण केली होती की, तिला पलंगावरुन उठताही येत नव्हते. 

आफताबची श्रद्धाला जबर मारहाण
श्रद्धाने पुढे लिहिले की, आफताबच्या आई-वडिलांच्या घरी गेल्यानंतर सर्वकाही ठीक झालं होतं. तो आज जातोय, पण मी आज जात नाहीये. कारण त्याने मला खूप मारहाण केलीये. माझे ब्लड प्रेशर लो झाले आहे, माझ्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. पलंगावरुन उठण्याचीही शक्ती माझ्यात नाही, अशी माहिती श्रद्धाने चॅटिंगमध्ये दिली. 

आफताबला पश्चाताप नाही
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आता आरोपी आफताब पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आफताबचा खोटेपणा सतत समोर येत आहे. त्याने इतक्या धूर्तपणे खून केला आहे की, तो न्यायालयात सिद्ध करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याला श्रद्धाची हत्या केल्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. तो लॉकअपमध्ये शांतपणे झोपतो. 

Web Title: Shraddha Walker Murder Case: 'He beat a lot, can't get out of bed...' Shraddha's chat leaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.