Shraddha Walker Murder Case: आफताबचा पॉलिग्राफला चकमा; नार्कोही फेल झाल्यास तिसरी टेस्ट, पोलिसही लागले तयारीला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 03:27 PM2022-11-30T15:27:58+5:302022-11-30T15:33:09+5:30

Shraddha Walker Murder Case: पोलिसांना आफताबच्या पॉलिग्राफिक टेस्टमध्ये सध्या तरी काही यश मिळालेले नाही.

Shraddha Walker Murder Case: If Aaftab does not give correct answers in the narco test, he will be subjected to brain mapping test. | Shraddha Walker Murder Case: आफताबचा पॉलिग्राफला चकमा; नार्कोही फेल झाल्यास तिसरी टेस्ट, पोलिसही लागले तयारीला!

Shraddha Walker Murder Case: आफताबचा पॉलिग्राफला चकमा; नार्कोही फेल झाल्यास तिसरी टेस्ट, पोलिसही लागले तयारीला!

Next

नवी दिल्ली- श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आता हळूहळू आफताबने खेळलेला गेम त्याच्यावरच उलटू लागला आहे. आफताबची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण झाली आहे. पॉलिग्राफ टेस्टमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे देताना आफताबने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांना आफताबच्या पॉलिग्राफिक टेस्टमध्ये सध्या तरी काही यश मिळालेले नाही. आफताबने गुन्हाचा सिक्वेन्स आणि पुरावे लपविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे पोलिसांना आता घटनाक्रम आणि पुरावे जुळवावे लागणार आहेत. आफताबने विविध प्रश्नांची उत्तरे न पटण्यासारखी दिली. त्यामुळे आफताबच्या या टेस्टचा निकाल काय येतो यावर पोलिसांचे पुढील फासे अवलंबून आहेत. 

आफताबची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण; मात्र हे ४ प्रश्न अजूनही अनुत्तरीत, नार्कोसाठी ठेवले राखून?

पॉलिग्राफ टेस्टनंतर आता आफताबची नार्को टेस्टही करण्यात येणार आहे. १ आणि ५ डिसेंबरला आफताबला फॉरेन्सिक सायन्स लॅब, रोहिणी येथे नेण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता. त्याला परवानगी दिली आहे. रोहिणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये एफएसएलच्या (न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा) तज्ज्ञ पथकाकडून आफताबची नार्को टेस्ट होणार आहे. पॉलिग्राफ टेस्टप्रमाणे नार्को टेस्टमध्येही आफताबने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केल्यास ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात येईल. पोलिसांनी या टेस्टची तयारीही करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, आफताबच्या आरोपींसाठी तिहार तुरुंग प्रशासनाची आधीपासूनच तयारी होती. आफताबची सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे तुरुंग प्रशासनानं आवश्यक सर्व व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आफताबला वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याच्या सेलमध्ये आफताबसोबत इतर कोणताही कैदी नाही. तसंच सेलच्या बाहेर २४ तास एक पोलीस हवालदार तैनात असतो. जो त्याच्यावर नजर ठेवून आहे. आफताबला ठेवण्यात आलेला सेल असा आहे की ज्यातून कैद्याला लवकर बाहेर काढता येत नाही. सीसीटीव्ही कॅमेराची देखील आफताबवर नजर आहे. आफताबला जेवण देण्याआधी जेवणाचीही तपासणी केली जाते.

त्या मुलीपर्यंत पोहोचले पोलीस-

श्रद्धा हत्याप्रकरणाबाबत जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. यातच पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले आहेत की जीची आफताबसोबत नकळतपणे भेट झाली होती. तिच्याकडून काहीतरी माहिती मिळेल या हेतूनं पोलिसांनी प्रयत्न केला. आफताब एका डेटिंग अॅपचा वापर करत होता. त्यामाध्यमातून त्यानं अनेक मुलींशी मैत्री केली होती. याच डेटिंग अॅपच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या एका मुलीला त्यानं आपल्या घरी बोलावलं होतं. पोलिसांनी याच मुलीचा शोध घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही मुलगी व्यवसायानं मानसोपचारतज्त्र आहे. पोलिसांनी तिची चौकशी केली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार तिच्याकडून आफताबबाबत काही महत्वाचे धागेदोरेही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Shraddha Walker Murder Case: If Aaftab does not give correct answers in the narco test, he will be subjected to brain mapping test.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.