Shraddha Walker Murder Case: '18 पॉलिथीनमध्ये ठेवले होते मृतदेहाचे तुकडे', श्रद्धा मर्डर केसच्या फॉरेन्सिक तपासात झाले धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 07:08 PM2022-11-17T19:08:22+5:302022-11-17T19:08:57+5:30

महत्वाचे म्हणजे, हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबला जवळपास 10 तास लागले होते, असेही त्याने चौकशी दरम्यान सांगितले आहे.

Shraddha walker murder case shocking details revealed in forensic investigation | Shraddha Walker Murder Case: '18 पॉलिथीनमध्ये ठेवले होते मृतदेहाचे तुकडे', श्रद्धा मर्डर केसच्या फॉरेन्सिक तपासात झाले धक्कादायक खुलासे

Shraddha Walker Murder Case: '18 पॉलिथीनमध्ये ठेवले होते मृतदेहाचे तुकडे', श्रद्धा मर्डर केसच्या फॉरेन्सिक तपासात झाले धक्कादायक खुलासे

googlenewsNext

श्रद्धा मर्डर केसने संपूर्ण देश हादरला आहे. ही केस दिल्ली पोलिसांसाठी एक मोठे आव्हान बनली आहे. आरोपी आफताब अमीन पुनावालाने अद्याप चौकशीमध्ये म्हणावे तसे सहकार्य केलेले नाही. यामुळेच अद्याप पोलिसांना हत्याकांडात वापरलेला सुरा आणि श्रद्धाचा मोबाइल फोन मिळालेला नाही. पोलीसांनी बुधवारी आरोपीला ज्या फ्लॅटमध्ये हत्याकांड झाले त्या फ्लॅटमध्ये नेले होते. यातच यासंदर्भात फॉरेन्सिक टीमने बरीचशी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

फॉरेन्सिक टीमला लीड करणारे अधिकारी संजीव गुप्ता म्हणाले, फ्लॅटमध्ये केवळ एकाच ठीकाणी रक्ताचे अंश आढळून आले. संपूर्ण तपासादरम्यान केवळ किचनमध्येच रक्ताचे अंश मिळाले. चौकशीदरम्यान आफताबने सांगितले की, श्रद्धाच्या मृतदेहाचा एक तुकडा स्वयंपाकघरात ठेवला होता, तेथेच रक्ताचे अंश आढळून आले आहेत. फ्रीज असलेली रूम, बाथरूम सर्व स्वच्छ होते. हत्येला बरेच दिवस झाल्याने, अनेक वेळा क्लीनिंग झाली असेल. यामुळे रक्ताचे अंश मिळू शकले नाही. ते एका हिंदी वृत्त वाहिनीसोबत बोलत होते.

संबंधित अधिकाऱ्याने सांगितले, की श्रद्धाच्या रक्ताचे अंश शोधण्यासाठी केमिकलचा वापर करण्यात आला. आरोपी अफताबने बाथरूममध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. तो जेव्हा तिच्या शरीराचे तुकडे करायचा, तेव्हा बाथरूममध्ये पाणीही सुरू करत होता. यामुळेही बाथरूममध्ये रक्ताचे अंश आढळून आले नाही. बाथरूममध्ये रक्ताचे अंश सापडण्याची शक्यता कमी असते. कारण तेथे नेहमीच पाण्याचा वापर होत असतो. आफताब एवढा हुशार होता, की ज्यावेळी त्याने प्रत्येक गोष्ट केमिकलच्या सहाय्याने साफ केली, तेव्हा बाथरूमही साफ केले असेल.

17-18 पॉलिथीनमध्ये ठेवले होते मृतदेहाचे तुकडे - 
फॉरेन्सिक टीमने दिलेल्या माहितीनुसार, मेहरौलीच्या नाल्यातून हाडे सापडली आहेत. श्रद्धाचा गळा बेडवर दाबण्यात आला गेला. मात्र तेथूनही काहीच सापडले नाही. आफताबच्या सांगण्यावरून मेहरौलीमध्ये हाडे सापडली आहेत. हाडांचा डीएनए मॅच झाला, तर ते श्रद्धाचेच असल्याचे स्पष्ट होईल. आरोपीने मृतदेहाचे तुकडे 17-18 पॉलिथिनमध्ये फ्रीजमध्ये  ठेवले होते. जेव्हा तपासणी केली, तेव्हा फ्रीजमध्ये काही अन्न होते, बाकी फ्रीज पूर्णपणे स्वच्छ होते. 

महत्वाचे म्हणजे, हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबला जवळपास 10 तास लागले होते, असेही त्याने चौकशी दरम्यान सांगितले आहे.
 

Web Title: Shraddha walker murder case shocking details revealed in forensic investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.