'आफताब गळा दाबून मारहाण करतोय'; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार केलेली, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 04:50 PM2022-11-19T16:50:29+5:302022-11-19T16:50:38+5:30
Shraddha Walker Murder Case: २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती.
मुंबई- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान पोलिसांना एक महत्वाची माहिती समोर आली आहे. श्रद्धा आणि आफताब यांचे सुरुवातीपासूनच भांडणं सुरु होती. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. आफताब हा गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा पूर्वमधील तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र १९ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली असल्याचे समोर आले आहे.
'आफताब बॅग घेऊन दिसला'; श्रद्धा हत्याकांड प्रकरणातील महत्वाचं CCTV फुटेज लागलं हाती
श्रद्धाने तक्रार दाखल केल्यानंतर तुळींज पोलिसांनी याबाबत कारवाई का केली नाही, तिने तक्रार मागे घेईपर्यंत पोलिसांनी वाट पाहिली, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, श्रद्धाच्या तक्रारीची माहिती देण्यास तुळींज पोलिसांनी टाळाटाळ केली असून ही माहिती तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर श्रद्धा आज या जगात असती, अशीही चर्चा रंगली आहे.
आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान पोलिसांना एक महत्वाचा सीसीटीव्ही फुटेज हाती लागला आहे. यामध्ये आरोपी आफताबच्या हातात एक बॅग दिसत आहे. दिल्ली पोलिसांना १८ ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. यामध्ये श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताबच्या हातात बॅग दिसत आहे. आफताब १८ ऑक्टोबर रोजी श्रद्धाच्या विकृत मृतदेहाचे उरलेले तुकडे फेकण्यासाठी गेला असावा असा पोलिसांना संशय आहे.
नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहेस का?; न्यायालयाच्या प्रश्नावर आफताबचं एका वाक्यत उत्तर!
आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान पोलिसांना एक महत्वाचा सीसीटीव्ही फुटेज हाती लागला आहे. यामध्ये आरोपी आफताबच्या हातात एक बॅग दिसत आहे. दिल्ली पोलिसांना १८ ऑक्टोबरचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. यामध्ये श्रद्धाचा खून करणाऱ्या आफताबच्या हातात बॅग दिसत आहे. आफताब १८ ऑक्टोबर रोजी श्रद्धाच्या विकृत मृतदेहाचे उरलेले तुकडे फेकण्यासाठी गेला असावा असा पोलिसांना संशय आहे.
वेब सीरिज पाहिली-
श्रद्धा वालकरच्या मृतदेहाची खांडोळी करायला आरोपी आफताब पूनावाला याला सुमारे १० तास लागले. काम संपवून त्याने बीअर आणली, मग नेटफ्लिक्सवर वेब सीरिज पाहिली आणि झोपी गेला.
मैत्रीण फ्लॅटवर-
श्रद्धाची हत्या केल्यानंतरही आफताबने एका मैत्रिणीला फ्लॅटवर आणले होते. श्रद्धा फ्लॅटवर नसतानाही तो पूर्वी असे करीत असे. यावरुन दोघांत भांडणे होत होती. पोलीस या मुलीचाही शोध घेत आहेत. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने त्याचा जुना फोन ओएलएक्सवर विकल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. पोलिस हा फोन परत मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.