Shraddha Murder Case: दोघांमधील ते एक साम्य ठरलं घातक; श्रद्धा अन् आफताबची नेमकी जवळीक का झाली?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 10:56 AM2022-11-16T10:56:00+5:302022-11-16T11:02:50+5:30

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा आणि आफताबची एका डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही लिव्ह इन-रिलेशनमध्ये राहू लागले.

Shraddha Walker Murder Case: Shraddha Walker and Aftab Poonawala met on a dating app. | Shraddha Murder Case: दोघांमधील ते एक साम्य ठरलं घातक; श्रद्धा अन् आफताबची नेमकी जवळीक का झाली?, पाहा

Shraddha Murder Case: दोघांमधील ते एक साम्य ठरलं घातक; श्रद्धा अन् आफताबची नेमकी जवळीक का झाली?, पाहा

googlenewsNext

नवी दिल्ली: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणी (Shraddha Walker Murder Case) एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. 

श्रद्धा आणि आफताबची एका डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही लिव्ह इन-रिलेशनमध्ये राहू लागले. दोघंही वसई येथील रहिवाशी असल्याने त्यांचं जास्त जुळून आलं. दोघंही जास्त जवळीक येण्याचं हेच एक कारण ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच लग्नाच्या बहाण्यानं श्रद्धाला आफताब दिल्लीत घेऊन गेला होता. अनेक दिवस उलटल्यानंतर श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावल्यामुळे आपण कंटाळून तिची हत्या केल्याची कबूली दिली आहे. तसेच तिचे ३५ तुकडे करुन, दिल्लीच्या परिसरात फेकल्याची माहितीही त्याने दिली आहे. 

'दररोज नवीन अनुभव...'; श्रद्धाची 'ती' पोस्ट ठरली अखेरची, दोघंही गेलेले हिमाचल प्रदेशात!

आफताब हा कॉलसेंटरमध्ये काम करण्याअगोदर मुंबई येथे एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ होता. त्यामुळे त्याला मांसाचे तुकडे कसे करायचे याबाबत माहिती होते. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने ३०० लिटरचा फ्रिज घेतला होता. त्यात त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे १५ दिवस ठेवले होते. प्रत्येक दिवशी एक दोन तुकडे तो दिल्लीच्या परिसरात फेकत होता. 

दरम्यान, श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मंगळवारी मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे. 

श्रद्धाचा फोन २ महिन्यांपासून बंद-

श्रद्धा गेल्यानंतर मला तिची मैत्रीण शिवानी म्हात्रे व लक्ष्मण नाडर यांनी सांगितले की, श्रद्धा व आफताबमधील संबंध बिघडले आहेत. आफताब तिला मारहाण करतो. मी तिला अनेकदा समजावले; पण तिने ऐकले नाही. त्यामुळे मी तिच्याशी बोलणे सोडले. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी लक्ष्मणने माझा मुलगा श्रीजयला फोन करून श्रद्धाचा फोन दोन महिन्यांपासून बंद असल्याचे सांगितले.  दुसऱ्या दिवशी मुलाने मला ही गोष्ट सांगितली. तेव्हा मी लक्ष्मणशी चर्चा केल्यानंतर माणिकपूर ठाण्यात श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, असे त्यांनी सांगितले.

दोन स्टेटमेंटमध्ये तफावत-

आफताब आणि त्याच्या आईला माणिकपूर पोलिसांनी श्रद्धाच्या गायबप्रकरणी पोलिस ठाण्यात ३ नोव्हेंबरला बोलावले होते. आरोपी आफताब याचे ३ नोव्हेंबर आणि त्याआधी दोन वेळा स्टेटमेंट घेतले. पण दोन्ही स्टेटमेंटमध्ये तफावत आढळल्याने माणिकपूर पोलिसांना संशय आल्याने ७ नोव्हेंबरला दिल्लीला गेले होते. 

 

Web Title: Shraddha Walker Murder Case: Shraddha Walker and Aftab Poonawala met on a dating app.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.