'Yes I killed her' श्रद्धाचे तुकडे करणाऱ्या आफताबची कबुली; चौकशीत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 08:39 PM2022-11-15T20:39:30+5:302022-11-15T20:43:36+5:30
हत्येच्या दिवशी काय घडलं या प्रश्नाच्या तपासात पोलिसांना थरकाप उडवणारी माहिती हाती लागली
नवी दिल्ली - श्रद्धा वालकर हत्याकांडात आरोपी आफताबनं हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कुठे फेकले? हे जाणून घेण्यासाठी पोलीस त्या जंगलात जाणार आहे. आफताबनं श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली असं पोलिसांनी म्हटलं. पोलिसांनी श्रद्धा आणि आफताब यांच्या कॉमन फ्रेंडचीही चौकशी सुरू केलीय.
पोलिसांच्या माहितीनुसार, आफताब केवळ इंग्रजीत बोलत आहे. Yes i killed Her सांगत आफताबनं श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली. परंतु आतापर्यंतच्या चौकशीत आणि तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. १८ मे रोजी आफताबनं गळा दाबून श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर पुढील ३ महिने हळूहळू तो मृतदेहाचे तुकडे फेकत होता. श्रद्धाच्या हत्येनंतर २ महिन्यांनी आफताब पुन्हा डेटिंग एपच्या माध्यमातून सक्रीय झाला होता. त्याने एका मुलीशी मैत्री केली होती. जून आणि जुलैमध्ये त्याच्या घरात श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे पडले असताना त्याने नव्या गर्लफ्रेंडला घरी बोलावलं होतं.
हत्येच्या दिवशी काय घडलं?
हत्येच्या दिवशी काय घडलं या प्रश्नाच्या तपासात पोलिसांना थरकाप उडवणारी माहिती हाती लागली. १८ मे रोजी श्रद्धा आणि आफताब यांच्या लग्नावरून भांडण झाले. या भांडणात आफताब श्रद्धाच्या छातीवर बसून तिचा गळा दाबू लागला. हत्या केल्यानंतर सर्वात आधी त्याने मृतदेह बाथरूममध्ये ठेवला. त्यानंतर इंटरनेटवरून मृतदेहाचा बंदोबस्त करण्यासाठी सर्च करू लागला. दुसऱ्यादिवशी त्याने इलेक्ट्रिक चाकू खरेदी केला त्याने मृतदेहाचे तुकडे केले. श्रद्धा आणि त्याचे रक्ताचे कपडे कचरा उचलणाऱ्या गाडीत फेकले. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कबर्ड, किचन आणि फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर इंटरनेटवर पुरावे मिटवण्याचा शोध घेऊ लागला.
बाजारात हायपोक्लोरिक एसिड खरेदी केले आणि घरातील लादी साफ केली जेणेकरून फॉरेन्सिक तपासात पुरावे मिळू नये. आफताबनं शेफचं ट्रेनिंग घेतले. हत्येच्या २ दिवस तो मृतदेहाचे तुकडे करत होता. पुढील ३ महिने त्याला एक एक तुकडे जंगलात फेकला. त्याचसोबत श्रद्धाचे सोशल मीडिया अकाऊंट एक्टिव्ह ठेवले जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये. आफताबनं श्रद्धाच्या नावानं मित्रांशी चॅटिंग केले होते. ६ महिने तो पोलिसांना चकमा देत होता. परंतु ज्यादिवशी पोलिसांनी त्याचं दार ठोठावले तेव्हा त्याचे सर्व प्लॅनिंग उघड झाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"