‘या’ व्यक्तीच्या मृत्यूनंतर तामिळनाडू पोलीस हादरले; DNA रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 06:33 PM2021-11-17T18:33:39+5:302021-11-17T18:33:58+5:30

सीआयडीने सीटी कोर्टाकडे अपील करत अंगोडाविरोधातील सर्व गुन्हे संपवण्याची मागणी केली.

Shrilankan Underworld Don Angoda Lokka's identity confirmed in DNA test | ‘या’ व्यक्तीच्या मृत्यूनंतर तामिळनाडू पोलीस हादरले; DNA रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

‘या’ व्यक्तीच्या मृत्यूनंतर तामिळनाडू पोलीस हादरले; DNA रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

Next

तामिळनाडूच्या कोयंबटूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी एका व्यक्तीचं ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. परंतु जेव्हा मृत व्यक्तीचा डीएनए रिपोर्टसमोर आला तेव्हा सगळ्यांना धक्काच बसला. हा व्यक्ती कुणी सर्वसामान्य व्यक्ती नव्हता तर त्याला श्रीलंकेतील सरकार पकडण्यासाठी हात धुवून मागे लागलं होतं. श्रीलंकेतील अंडरवर्ल्ड डॉन जो भारतात नाव लपवून बिनधास्त वावरत होता. त्याच्या मृत्यूनंतर हा खुलासा झाला आहे.

कोयंबटूर पोलिसांनुसार, श्रीलंकेचा अंडरवर्ल्ड डॉन अंगोडा लोक्का भारतात नाव बदलून प्रदीप सिंह नावानं वास्तव्य करत होता. ३ जुलै २०२० रोजी या डॉनचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पोस्टमोर्टम रिपोर्टनंतर त्यांच्यावर मदुरई इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु प्रदीप सिंहच्या ओळखीमुळे पोलिसांना त्याच्यावर संशय होता. श्रीलंका सरकारच्या मदतीनं लोक्का याच्या आईचा DNA नमुना घेण्यात आला. तो चेन्नईच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला. त्यानंतर हा व्यक्ती प्रदीप सिंह नसून अंडरवर्ल्ड डॉन अंगोडा लोक्का असल्याचं निष्पन्न झालं.

त्यानंतर सीआयडीने सीटी कोर्टाकडे अपील करत अंगोडाविरोधातील सर्व गुन्हे संपवण्याची मागणी केली. कारण मृत अंगोडाचा डीएनए त्याच्या आईशी मॅच झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, अंगोडा कोयंबटूरमध्ये मागील २ वर्षापासून लपून होता. पोलिसांनी अंगोडाची ओळख बदलण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवणून त्याला मदत करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. याच तिघांनी मदुरई येथे अंगोडा याच्यावर अंत्यसंस्कार केले होते. हे तिघंही श्रीलंकेतील असून लोक्कासोबत ते भारतात राहत होते.

Web Title: Shrilankan Underworld Don Angoda Lokka's identity confirmed in DNA test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.