Siddhu Moosewala : सिद्धू मुसेवाला हत्याकांडात आणखी एका गुंडाची एन्ट्री, म्हणे... मारेकऱ्यांचा शोध घेणाऱ्यास ५ लाख देईन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 02:27 PM2022-06-02T14:27:05+5:302022-06-02T14:45:26+5:30
Siddhu Moosewala : भुप्पी राणा म्हणाला की, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, त्यांना तो एक एक करून मारणार आहे.
चंदीगड : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात आता आणखी एक गँगस्टर भुप्पी राणाची एन्ट्री झाली आहे. गँगस्टर भुप्पी राणाने सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्यांचा पत्ता सांगणाऱ्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मूसेवाल यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, अशी पोस्ट भूपी राणाने फेसबुकवर केली आहे. भुप्पी राणा म्हणाला की, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, त्यांना तो एक एक करून मारणार आहे.
भुप्पी राणा नीरज बवाना आणि बंबीहा गँगशी संबंधित आहे. भुप्पी राणा म्हणाला की, विक्की मिंडूखेडा यांच्या हत्येत सिद्धू मुसेवालाची कोणतीही भूमिका नाही. आपण जे काही करतो ते आपण स्वतः करतो. त्याचवेळी, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपीला उत्तराखंड एसटीएफने अटक केली आहे.
आरोपी यात्रेकरूंच्या गर्दीत सामील होऊन पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ही अटक जवळपास फिल्मी पद्धतीने झाली. अटक करण्यात आलेला हा आरोपी कुख्यात लॉरेन्स विश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच उत्तराखंड पोलिसांनी अन्य पाच जणांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले.
प्रेयसीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बनला गँगस्टर, करोडोंच्या मालमत्तेचा मालक
त्याचवेळी सुरक्षा यंत्रणांशी संबंधित अधिकारी सांगतात की, ज्याप्रमाणे बॉलीवूडमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीचे वर्चस्व आहे, त्याचप्रमाणे पंजाब म्युझिक पंजाबचे गुंड पंजाब फिल्म इंडस्ट्रीमध्ये अस्तित्वासाठी स्पर्धा करत आहेत. हा ट्रेंड पूर्वी नगण्य होता, पण पंजाबमध्ये ज्याप्रकारे बंदूक संस्कृती वाढली आहे, क्वचितच असा पंजाबी गायक असेल की ज्याच्या गाण्यात बंदुक, रक्तपात याचा समावेश नसेल.