'हिंमत असेल तर बाहेर ये'; लॉरेन्स बिश्नोईला जीवे मारण्याची धमकी, बिलामध्ये लपवली चिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 03:52 PM2023-03-17T15:52:11+5:302023-03-17T15:54:47+5:30
Sidhu Moose Wala: गायक सिद्धु मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
गायक सिद्धु मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. विकी गोंडर ग्रुपने सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट शेअर करत धमकी दिली आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी लॉरेन्स बिश्नोई याने मोठे गौप्यस्फोट केले होते. या पाश्वभूमीवर आता धमक्या आल्या आहेत. त्यामुळे आता खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावरुन धमकी देण्यात आली आहे. या म्हटले आहे की,तुरुंगात बसून बोलत आहे, हिंमत असेल तर बाहेर ये, असंही या धमकीमध्ये म्हटले आहे. बिश्नोईसोबतच त्याचा साथीदार गोल्डी ब्रारलाही या पोस्टमध्ये जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'लॉरेन्स बिश्नोई, एकदा बाहेर ये, आत बसून तू फसतोयस. बाहेर येऊन लढण्याची हिंमत नाही आणि हे संपूर्ण पंजाबला माहीत आहे, असंही यात म्हटले आहे.
मुस्लिमांना भारतात भीती वाटते; यावर स्मृती इराणी म्हणाल्या- आपल्याच देशात हे अल्पसंख्याक कसे झाले..?
सोशल मीडियावरील दिलेली धमकीत म्हटले आहे की, 'गोल्डी ब्रार याने भावाचा बदला घेतला नाही.' लॉरेन्स बिश्नोई, जेव्हा विकी गौंडर जिवंत होता, तेव्हा तु गेला नाही. भीतीमुळे बाहेर गेला, असंही म्हटले आहे.
राजस्थानमध्ये झालेल्या चकमकीत लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गंगानगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. टोळीतील गुंड एका व्यावसायिकाकडून पैसे स्वरुपात खंडणी घेण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने येथील एका व्यावसायिकाला बोलावून धमकी दिली आणि पैशांची मागणी केली. गेल्या महिन्यात पोलिसांनी या संदर्भात एक पथक तयार केले होते, हे पथक तीन आरोपींचा शोध घेत होते. हे सर्वजण पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते.