Sidhu Musewala Murder: मुसेवालानं ना कमांडो नेले, ना बुलेट प्रूफ गाडी; डीजीपींनी सांगितलं मर्डर स्पॉटवर किती गोळ्या चालल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 01:33 AM2022-05-30T01:33:54+5:302022-05-30T01:34:36+5:30
पोलीस महासंचालक म्हणारे, पुढील महिन्यात, ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वर्धापनदिनानिमित्त तैनातीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मोकळे करण्यासाठी मुसेवालाची सुरक्षा कमी करण्यात आली होती. ते म्हणाले, मुसेवालांसाठी तैनात असलेल्या पंजाब पोलीसच्या चार कमांडोंपैकी दोन जणांना हटवण्यात आले होते.
प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या टोळ्यांमधील परस्पर वैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे. तसेच लॉरेन्स बिश्नोई टोळीचा यात सहभाग असल्याचे दिसते. रविवार सायंकाळी झालेल्या या हत्येच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे, असे पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP) व्ही के भवरा (VK Bhawra) यांनी म्हटले आहे. (DGP VK Bhawra on Moosewala Murder)
पोलीस महासंचालक म्हणारे, पुढील महिन्यात, ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वर्धापनदिनानिमित्त तैनातीसाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मोकळे करण्यासाठी मुसेवालाची सुरक्षा कमी करण्यात आली होती. ते म्हणाले, मुसेवालांसाठी तैनात असलेल्या पंजाब पोलीसच्या चार कमांडोंपैकी दोन जणांना हटवण्यात आले होते.
पोलीस महासंचालक भवरा म्हणाले, मुसेवाला उरलेल्या दोन कमांडोंना सोबत घेऊन गेला नव्हते. तसेच, घटनास्थळावरून गोळ्यांचे 30 रिकामे कवच जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात किमान तीन हत्यारे वापरण्यात आली असावीत, असा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तुरा यांचा मोठा खुलासा -
गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसंदर्भात मानसाचे एसएसपी (SSP) गौरव तुरा यांनी मोठा खुलासा केला आहे. कॅनडातील गँगस्टर गोल्डी बरारने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे तुरा यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर 3 गाड्यांनी मुसेवालाची थार थांबवली होती, असेही SSP तुरा यांनी म्हटले आहे.